लष्कराचे विमान घरावर कोसळले, दोन ग्रामस्थांचा मृत्यू
राजस्थानच्या हनुमानगड येथे सोमवारी सकाळी भारतीय हवाई दलाचे मिग २१ हे विमान कोसळले आहे. या दुर्घटनेत २ ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे. त्यात एका महिलेचा समावेश आहे. तर एकजण जखमी झाला आहे. तर पायलट आणि सहवैमानिकाने वेळीच उडी मारली त्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हे हवाई दलाचे विमान सूरतगडला जात होते. विमानात बसल्याने अपघात होणार असल्याचे पायलटच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने तात्काळ पॅराशूट घालून विमानातून उडी मारली. त्यामुळे विमानातील दोन्ही पायलट सुरक्षित बचावले. त्यांना काही झाले नाही. मात्र, नंतर विमान हनुमागड येथे कोसळले.
मिग-२१ ज्या छतावर पडले त्या छतावर तीन महिला आणि एक पुरुष होते. यामध्ये एका महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला. त्याचवेळी दोन महिलांना रुग्णालयात नेण्यात येत आहे. दरम्यान, या विमानाचा अपघात होणार असल्याचे कळाल्यानंतर पायलटने हे विमान गावाच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. दाट वस्तीच्या ठिकाणी विमान अपघात झाला असता तर अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.