'मलाच माहिती नाही मी कसा वाचलो...', दुर्घटनेतून बचावलेला एकमेव प्रवाशाने सांगितला थरारक अनुभव

अहमदाबादहून लंडन या ठिकाणी निघालेलं विमान टेक ऑफ नंतर 700 फुटावरुन खाली कोसळलं आणि काही क्षणात होत्याच नव्हत झालं.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Dhanshri Otari
  • Fri, 13 Jun 2025
  • 01:49 pm
Ahmedabad plane crash, Air India plane,  ramesh vishwashkumar, Plane Crash lone survivor ramesh vishwashkumar revelas how he survived from accident

अहमदाबादहून लंडन या ठिकाणी निघालेलं विमान टेक ऑफ नंतर 700 फुटावरुन खाली कोसळलं आणि काही क्षणात होत्याच नव्हत झालं. एअर इंडियाच्या या विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. यापैकी केवळ एकच व्यक्ती वाचली असून विश्वास कुमार रमेश असं या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा प्रवासी  ब्रिटिश नागरिक आहे. या दुर्घटनेनंतर प्रसार माध्यमांनी रमेश यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी थरारक अनुभव शेअर केला आहे. 

विश्वास कुमार रमेश हे  विमानातील 11A क्रमांकाच्या सीटवर होते अशी माहिती अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी.एस. मलिक यांनी दिली आहे. "विमानानं उड्डाण घेताच 30 सेकंदातच मोठा आवाज झाला आणि विमान कोसळलं. हे एवढ्या कमी वेळात घडलं की, काही समजलं नाही," असे रमेश यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं . रमेश यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पूर्ण घटनाक्रम उलगडा केला आहे. 

नेमकं काय घडलं? कसे काय वाचले?

सर्व काही माझ्या डोळ्यांसमोर झालं. मी त्यातून जिवंत कसा वाचलो यावर माझाही विश्वास बसत नाही आहे. थोड्या वेळासाठी आपलाही मृत्यू होईल असं मला वाटलं होतं. पण डोळे उघडल्यानंतर मी जिवंत असल्याचा भास झाला. मी सीटचा बेल्ट काढण्याचा प्रयत्न केला आणि निघालो. माझ्या डोळ्यांसमोर एअर होस्टेस आणि इतरजण जळाले.

मी ज्या बाजूला होतो ती बाजू हॉस्टेलवर लँड झाली नाही. तळमजल्यावर माझी बाजू लँड झाली होती. मी जिथे लँड झालो, ती खालची बाजू होती आणि थोडी जागा होती. दरवाजा तुटल्यानंतर जागा दिसली तर मी निघण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या बाजूला भिंत असल्याने कोणी निघू शकलं नसणार. मी कसं वाचलो हे मलाच माहिती नाही. आगीमुळे माझा डाव हात भाजला. नंतर मला रुग्णवाहिकेतून घेऊन आले, अशी माहिती रमेश यांनी दिली. 

माझा भाऊ माझ्यासोबतच प्रवास करत होता. आम्ही दीवला गेलो होतो. पण आता मला माझा भाऊ सापडत नाहीये अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

गेल्या २० वर्षांपासून रमेश हे लंडनमध्ये त्यांच्या कुटुंबासमवेत राहतात. ते काही दिवसांसाठी त्यांच्या नातेवाईकांना भेटायला भारतात आले होते. त्यांची पत्नी व मुलं लंडनमध्ये राहतात. अहमदाबादहून ते आपल्या भावासोबत परत निघाले होते. . अजय कुमार रमेश हे विमानात वेगळ्या रांगेत बसले होते. 

Share this story

Latest