मुलगी किंवा बाई ही गोष्टच अशी आहे की...

अजमेरचे सरवर चिश्ती यांच्या नव्या विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. चिश्ती म्हणतात की, मुलगी किंवा बाई ही गोष्टच अशी आहे की ज्यामुळे कुणाचाही पाय घसरू शकतो. अगदी विश्वामित्रही त्यासाठी अपवाद नाहीत. आता चिश्ती यांनी हे वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला असून त्याला विश्व हिंदू परिषदेने उत्तर दिले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Tue, 13 Jun 2023
  • 03:36 pm
मुलगी किंवा बाई ही  गोष्टच अशी आहे की...

मुलगी किंवा बाई ही गोष्टच अशी आहे की...

#जयपूर 

अजमेरचे सरवर चिश्ती यांच्या नव्या विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. चिश्ती म्हणतात की, मुलगी किंवा बाई ही गोष्टच अशी आहे की ज्यामुळे कुणाचाही पाय घसरू शकतो. अगदी विश्वामित्रही त्यासाठी अपवाद नाहीत. आता चिश्ती यांनी हे वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला असून त्याला विश्व हिंदू परिषदेने  उत्तर दिले आहे. विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विनोद बंसल उत्तर देताना म्हणतात की, काही लोक महिलांना उपभोगाची वस्तू समजतात. स्त्रीकडे भोगण्याची वस्तू म्हणून पाहतात, त्यांच्याकडून वेगळी काय अपेक्षा करायची?

सरवर चिश्तींनी असे म्हटले आहे की, माणूस पैशाने भ्रष्ट होत नाही, त्याची मूल्य भ्रष्ट होऊ शकत नाहीत. मात्र बाई ही अशी गोष्ट आहे, ज्यामुळे मोठ्या मोठ्या माणसाचा आणि मनावर संयम असल्याचा दावा करणाऱ्या माणसाचा पाय घसरतो. विश्वामित्र ऋषींचा पाय घसरला होता. एवढेच काय जेवढे बाबा लोक तुरुंगात आहेत ते सगळे बाईच्याच प्रकरणांमध्ये अडकले आहेत. मुलगी किंवा बाई हा असा विषय आहे ज्यामध्ये कुणाचाही पाय घसरू शकतो. 

या आधी सरवर चिश्ती यांनी म्हटले होते की, काश्मीर फाईल्स असो की केरला स्टोरी, आता अजमेर फाईल्स ९२ सिनेमा येत आहे. ज्या ठिकाणी निवडणुका असतात तेथे अशा प्रकारचा सिनेमा आणला जातो. कर्नाटकात भाजपचा पराभव झाला. आता अजमेर ९२ सिनेमात अडीचशे मुलींवर बलात्कार झाल्याचे आणि त्यांना ब्लॅकमेल केल्याचे दाखवले असल्याचे मी ऐकले. मात्र त्यावेळी तक्रार केली होती ती १२ मुलींनीच असंही चिश्ती यांनी म्हटलं आहे. एवढेच नाही तर चिश्ती यांनी हा आरोप केला आहे की, हा सिनेमा ख्वाजा गरीब नवाज चिश्ती हा दर्गा आणि एका शिक्षण संस्थेला बदनाम करण्यासाठी आणला जातो आहे. दर्ग्यात असा कुठलाही प्रकार घडला नव्हता. जे प्रकरण त्यावेळी घडले त्यात अनेक लोक सहभागी होते.

या प्रकरणी विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विनोद बंसल म्हणाले की, अजमेर ९२ या सिनेमावर चिश्ती यांच्या वक्तव्याने ते सत्य असल्याची मोहरच लावली आहे. जे स्त्रीला उपभोग्य वस्तू समजतात त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे. तीन तलाक, हिजाब आणि काळ्या बुरख्यांमध्ये जे बायकांना ठेवतात त्यांचे विचारही तसेच असणार. आम्हाला यांची लाज वाटते की हे स्वतःला भारतीय म्हणवत आहेत. हे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest