नौका उलटून २२ जणांचा मृत्यू !
केरळमधील मल्लपूरम जिल्ह्यातील तानुरजवळ एक नौका उलटून २२ जण मृत्युमुखी पडले असून बुडालेल्या लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या घटनेची चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केली असून मृतांच्या नातेवाईकांना दहा लाखांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. या दुर्घटनेतील दहा जणांवर उपचार सुरू असून उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार आहे.