Salim Akhtar : ज्येष्ठ चित्रपट निर्माते सलीम अख्तर यांचे निधन, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ चित्रपट निर्माते सलीम अख्तर यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 9 Apr 2025
  • 02:38 am
pune mirror, crime news, marathi news, pune news, pune police

Veteran filmmaker Salim Akhtar passes away

ज्येष्ठ चित्रपट निर्माते सलीम अख्तर यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

सलीम अख्तर हे चित्रपट निर्माते म्हणून सक्रीय होते. सलीम अख्तर यांनी आफताब पिक्चर्स या बॅनरखाली ‘बटवारा’, ‘लोहा’, ‘कयामत’, ‘बाजी’, ‘इज्जत’, ‘फूल और अंगार’, ‘आदमी’, ‘बादल’ आणि ‘दूध का कर्ज’ यांसारख्या अनेक  चित्रपटांची निर्मिती केली. त्यांनी शमा अख्तर यांच्याशी विवाह केला होता. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आज, बुधवार ०९ एप्रिल रोजी दुपारी १.३० वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

 

Share this story