संग्रहित छायाचित्र
गेल्या काही दिवसात अनेक मराठी अभिनेत्रींनी बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे. डाएट, जिमच्या आधारे त्यांनी कमालीचं वजन घटवलं. 'मुरांबा' फेम अभिनेत्री काजल काटेचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून आश्चर्य वाटेल. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत तिचा हा प्रवासही सांगितला आहे. फोटोत तिचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून कोणाचाही विश्वास बसणं कठीण आहे.
काजलने आधी आणि नंतर असा फोटो शेअर करत लिहिले, "हा फक्त वजन घटवण्यासाठीचा प्रवास नव्हता तर आत्मविश्वास परत मिळवण्याचा, भीती घालवण्याचा आणि त्या प्रत्येक गोष्टीवर मात करण्याचा होता ज्याने मला कायम मागे राहायला लागलं. या दरम्यान मी वेदना, शांतता आणि सहज हार मानेल अशा अगणित क्षणांमधून गेले. मी हे फक्त कॅमेरासाठी केलेले नाही पण आरश्यात दिसत असलेल्या व्यक्तीसाठी केलं आहे. मोठी स्वप्न पाहणारी आणि एकाच गोष्टीवर समाधान न मानणारी ही व्यक्ती आहे. शारिरीक बदलापेक्षाही ही बरंच मोठं आहे. शिस्त, विश्वास आणि इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही तुमची गोष्ट लिहू शकता हेच यातून सिद्ध होतं."
एक वेळ अशी आली जेव्हा माझं वजन स्थिर झाले होते तेव्हा मला माझ्या न्युट्रिशनिस्टची मदत मिळाली. १७.६ किलो वजन घटवण्यात मला यश आलं आहे. अजूनही ध्येय बाकी आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. १० मे २०२४ ते १० मे २०२५ चा हा एक वर्षाचा प्रवास."
काजलने गेल्या वर्षीच 'मुरांबा' मालिका सोडली होती. तेव्हा तिचं वजन खूप जास्त होतं. त्याआधी काजला प्रार्थना आणि श्रेयस तळपदेच्या गाजलेल्या 'माझी तुझी रेशिमगाठ' मालिकेत दिसली होती. काजलच्या या ट्रान्सफॉर्मेशनवर अनेक कलाकारांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे.