शाहरुखसोबत 'डंकी'मध्ये दिसलेल्या अभिनेत्याची किडनी निकामी, उपचारासाठी पैशांची गरज, मित्राचे मदतीसाठी आवाहन

शाहरुख खान आणि विकी कौशल यांच्यासोबत 'डंकी' चित्रपटात दिसलेला अभिनेता वरुण कुलकर्णी सध्या मोठ्या अडचणीत सापडला आहे. वरुणची किडनी निकामी झाली आहे आणि तो डायलिसिसवर आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 22 Jan 2025
  • 08:11 am
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

शाहरुख खान आणि विकी कौशल यांच्यासोबत 'डंकी' चित्रपटात दिसलेला अभिनेता वरुण कुलकर्णी सध्या मोठ्या अडचणीत सापडला आहे. वरुणची किडनी निकामी झाली आहे आणि तो डायलिसिसवर आहे. यामुळे त्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. वरुण कुलकर्णीला आठवड्यातून दोन दिवस डायलिसिस घ्यावे लागत आहे. तसेच त्याला वैद्यकीय बिल भरणेही शक्य होत नाहीये. अशा कठीण काळात त्याचा मित्र रोशन शेट्टीने सोशल मीडियावर त्याला मदत करण्याचे आवाहन केले आहे.

वरुण कुलकर्णी याला नुकतंच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  त्याची प्रकृती चिंताजनक आहे. रोशन शेट्टीने वरुणच्या तब्येतीची माहिती दिली. कठीण काळात त्याला मदत करण्याचे आवाहनही केले आहे.

रुग्णालयात बेडवर पडलेल्या अवस्थेतील वरुण कुलकर्णीचे  काही फोटो रोशन शेट्टीने  शेअर केले आहेत. त्यासोबतच डायलिसिस मशीनसोबत देखील वरुणचे फोटो त्याने शेअर केले आहे. रोशन शेट्टीने लिहिले आहे की, माझा मित्र आणि रंगभूमीवरील सह-अभिनेता वरुण कुलकर्णी सध्या किडनीच्या गंभीर समस्येने ग्रस्त आहे. आम्ही त्याच्या उपचारासाठी पैसे उभारण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र त्याच्या उपचाराचा खर्च वाढतच चालला आहे. त्याला आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसिससाठी नियमित रुग्णालयात जावे लागते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Roshan Shetty (@roshaan_shetty)



रोशन शेट्टी पुढे लिहितो की, वरुण हा केवळ एक अद्भुत अभिनेताच नाही तर तो एक दयाळू आणि निस्वार्थी व्यक्ती देखील आहे. त्याने खूप लहान वयातच त्याचे आईवडील गमावले. त्याने स्वतःची ओळख निर्माण केली.  अनेक अडचणींना तोंड देऊनही तो रंगभूमीवरील त्याची आवड पूर्ण करत आहे. पण प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात आर्थिक अडचणी येतात आणि यावेळी वरुणला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे.

रोशन शेट्टी याने पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, वरूणचे  मित्र आणि इतर हितचिंतक या कठीण काळात वरुणला मदत करत आहेत. रोशनने लोकांना वरुणला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले.

'डंकी' चित्रपटात वरुण कुलकर्णीने एक छोटीशी भूमिका साकारली आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त, वरुण कुलकर्णी 'स्कॅम १९९२' आणि 'द फॅमिली मॅन' मध्येही दिसला होता.

 

Share this story

Latest