संग्रहित छायाचित्र
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता संदीप पाठकने त्याच्या अभिनयाची छाप मराठी प्रेक्षकांवर पाडली आहे. या अभिनेत्याने अतिशय कष्टातून चित्रपटसृष्टीत नाव कमावलं आहे. त्याने मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
संदीप प्लॅनेट मराठीच्या 'पटलं तर घ्या' या कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्यात त्याने केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. संदीपने वयाच्या 21 व्या वर्षी पहिल्यांदा समुद्र पहिला आहे. याविषयीचा अनुभव सांगत त्याने दुष्काळी भागातील भीषण परिस्थिती सांगितली.
संदीप मूळचा मराठवाड्यातील बीड मधील माजलगाव या गावचा आहे. हा भाग मुख्यतः दुष्काळी भाग आहे. तिथे जास्त पाऊस पडत नाही. त्यामुळे 21 व्या वर्षी पहिल्यांदा समुद्र पाहिल्यानंतर त्याचं अफाट पाणी पाहून संदीप भांबावून गेला.