नाटकाचा प्रयोग सुरू असताना झाला गर्भपात…

अभिनेत्री सुरभी भावेने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात असते. अनेकदा ती तिच्या भावना व्यक्त करतानादेखील दिसते. आता एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या खासगी तसेच अभिनयातील प्रवासाबद्दल वक्तव्य केले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 13 Jun 2025
  • 05:27 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune Newsz

संग्रहित छायाचित्र

अभिनेत्री सुरभी भावेने ‘भाग्य दिले तू मला’, ‘स्वामिनी’ या मालिकांमध्ये काम करत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. आता सध्या ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेत ती वल्लरी ही भूमिका साकारत आहे. अभिनेत्री सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात असते. अनेकदा ती तिच्या भावना व्यक्त करतानादेखील दिसते. आता एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या खासगी तसेच अभिनयातील प्रवासाबद्दल वक्तव्य केले आहे. याबरोबरच, नाटकाच्या प्रयोगादरम्यान गर्भपात झाल्याचा खुलासा तिने केला आहे.

सुरभी भावे एक प्रसंग सांगत म्हणाली, 'पहिल्या मुलीनंतर पुन्हा गरोदर होते. माझा नाटकाचा प्रयोग सुरू होता आणि त्या चालू नाटकाच्या प्रयोगात माझा गर्भपात झाला होता. पण, त्याही वेळेला मी कधी थांबले नाही किंवा अतिशोयोक्ती केली नाही. माझं असं म्हणणं होतं की जे व्हायचं आहे, ते घडून गेलं आहे, प्रयोग थांबवण्यात काही अर्थ नाही. तेव्हाही माझ्या नाटकातील सहकलाकारांनी मला खूप पाठिंबा दिला. ‘सागरा प्राण तळमळला’ नावाचं नाटक होतं. त्यामध्ये संध्या म्हात्रे, अंगद मस्कर ही सगळी मंडळी होती. जेव्हा त्यांना याबद्दल कळलं तेव्हा तो सगळ्यांसाठीच भावूक क्षण होता. त्यानंतर मी दवाखा न्यात गेले. पुन्हा दुसऱ्या दिवशी शूटिंगला गेले होते”, अशी आठवण सुरभीने सांगितली आहे.

सुरभी भावेने ‘मराठी मनोरंजन विश्व’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, 'मी कधीच वाईट मार्ग अवलंबून कधीच कुठलीच कामं मिळवली नाहीत आणि इथून पुढे मिळवणारही नाही. माझी माझ्या कामावर प्रचंड श्रद्धा आहे. यामुळेच माझी मुलगी तीन महिन्यांची झाल्यानंतर मी कामाला सुरुवात केली होती. ती ज्या दिवशी तीन महिन्यांची झाली, त्या दिवशी मी सेटवर होते.'

अभिनेत्री असेही म्हणाली की, ती कामाला प्राधान्य देते. सुरभी म्हणाली, 'जेव्हा मी गरोदर होते, तेव्हा मला अनेक लोकांनी असं सांगून घाबरवलं होतं की आता पाच वर्षांचा गॅप येणार. पण, मला पाच महिनेही गप्प बसायचं नाही, कारण मला कामाची सवय होती. यामध्ये माझ्या पतीने मला साथ दिली. घरच्यांनी पाठिंबा दिला.

Share this story