संग्रहित छायाचित्र
सनी देओल नितेश तिवारीच्या ‘रामायण’ चित्रपटात दिसणार आहे. तो या चित्रपटात हनुमानाचे पात्र साकारणार असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून होती. मात्र, सनी त्यावर काहीच बोलला नव्हता. अलीकडे त्याने आपण ‘रामायण’ चित्रपटात काम करत असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, नेमकी कोणती भूमिका साकारणार हे त्याने अद्याप जाहीर केले नाही. असे असले तरी, सनीची पर्सनॅलिटी बघता तो हनुमानाच्याच भूमिकेत दिवणार असल्याचे बोलले जात आहे.
या चित्रपटात तो हनुमानाची भूमिका साकारणार असल्याच्याही अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. दरम्यान, अभिनेत्याने एका मुलाखतीदरम्यान चित्रपटाबाबत अनेक खुलासे केले आहेत. नितीश तिवारी दिग्दर्शित रामायण हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच चर्चेत आहे.
सनीने या चित्रपटाचा एक भाग असल्याची पुष्टी स्वत: केली आहे. मात्र, त्याने अद्याप त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. सनी म्हणाला, ‘‘हा एक मोठा प्रकल्प आहे, कारण निर्माते त्याला ‘अवतार’ आणि ‘प्लॅनेट ऑफ द एप्स’सारख्या चित्रपटांप्रमाणे बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. चित्रपट कसा बनवायचा आहे आणि पात्रांची मांडणी कशी करायची आहे, याबद्दल लेखक आणि निर्माता अगदी स्पष्ट असतात. मी या चित्रपटाचा एक भाग आहे, याचा मला आनंद वाटतो.’’
‘रामायण’ चित्रपटात तुम्हाला चित्रपटात स्पेशल इफेक्ट्स पाहायला मिळतील, ज्यामुळे तुम्हाला घटना खरोखर तुमच्यासमोर घडत असल्यासारखे वाटेल. मला खात्री आहे की हा एक उत्कृष्ट चित्रपट असेल आणि मला खात्री आहे की तो सर्वांना आवडेल.
सनी देओलच्या आधी रणबीर कपूरनेही नुकतेच नितेश तिवारीच्या रामायण या चित्रपटात काम करत असल्याची पुष्टी केली आहे. त्याने पहिल्या भागाचे शूटिंग पूर्ण केले असून लवकरच तो दुसऱ्या भागाचे शूटिंग सुरू करणार आहे. रणबीर पुढे म्हणाला, ‘‘मी रामजीची भूमिका साकारण्यासाठी खूप उत्सुक आहे. हे माझ्यासाठी एक स्वप्न आहे. हा एक असा चित्रपट आहे ज्यामध्ये सर्व काही आहे. भारतीय संस्कृती काय आहे, हे शिकवते.’’
काही काळापूर्वी यशने ‘हॉलिवूड रिपोर्टर’ला दिलेल्या मुलाखतीतही आपण रामायण चित्रपटात रावणाची भूमिका साकारत असल्याचे सांगितले होते. तो म्हणाला होता, ‘‘एक अभिनेता म्हणून रावणाची भूमिका साकारणे माझ्यासाठी खूप रोमांचक आहे. मला त्याच्या पात्रातील बारकावे आवडतात.’’
टीव्ही अभिनेता रवी दुबेनेही आपली भूमिका उघड केली आहे. त्याने रणबीर कपूरसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. तसेच, चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना तो म्हणाला होता, ‘‘’चित्रपटात मी लक्ष्मणची भूमिका साकारत आहे. शेवटी मला निर्मात्यांकडून माझ्या पात्राबद्दल काहीही सांगण्याची परवानगी मिळाली.’’
काही काळापूर्वी निर्माता नमित मल्होत्रा यांनी एक पोस्ट शेअर करून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. त्यांनी असेही लिहिले- 'हे महाकाव्य मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी मी खूप प्रयत्न सुरू केले होते. ज्याने पाच हजासर वर्षांहून अधिक काळ कोट्यवधी हृदयांवर राज्य केले आहे, ते सुंदर आकार घेत आहे हे पाहून मी रोमांचित आहे. आमच्या कार्यसंघाचे एकच उद्दिष्ट आहे: आपल्या इतिहासाचे, आपले सत्य आणि आपली संस्कृती - आपले रामायण, जगभरातील लोकांसमोर सर्वात प्रामाणिक, पवित्र रूप सादर करणे.
‘रामायण’ या चित्रपटात रणबीर कपूर रामाची तर साई पल्लवी सीतेची भूमिका साकारणार आहे. तर, सुपरस्टार यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित होणार असून, त्यातील पहिला भाग २०२६ मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर तर दुसरा भाग २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.