गौरीची स्पेशालिटी

लोकप्रिय अभिनेता शाहरुख खानची पत्नी व उद्योजिका गौरी खान ‘तोरी’ या रेस्टॉरंटची मालकीण आहे. या रेस्टॉरंटला अनेक कलाकार मंडळी भेट देत असतात. तर गौरी व खान कुटुंबीयदेखील अनेकदा या रेस्टॉरंटमध्ये एकत्र पाहायला मिळतात. अशातच आता नुकतंच या रेस्टॉरंटचा मुख्य शेफ स्टीफन याने खान कुटुंबीयांबद्दल सांगितलं आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 17 Jun 2025
  • 12:44 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune Newsz

संग्रहित छायाचित्र

लोकप्रिय अभिनेता शाहरुख खानची पत्नी व उद्योजिका गौरी खान ‘तोरी’ या रेस्टॉरंटची मालकीण आहे. या रेस्टॉरंटला अनेक कलाकार मंडळी भेट देत असतात. तर गौरी व खान कुटुंबीयदेखील अनेकदा या रेस्टॉरंटमध्ये एकत्र पाहायला मिळतात. अशातच आता नुकतंच या रेस्टॉरंटचा मुख्य शेफ स्टीफन याने खान कुटुंबीयांबद्दल सांगितलं आहे.

त्याने रेस्टॉरंटमध्ये शाहरुख खान व कुटुंबीयांसाठी एक खास दरवाजा असल्याचं सांगितलं आहे. गौरीच्या रेस्टॉरंटचे शेफ स्टीफनने माध्यमाशी संवाद साधताना याबद्दल सांगितलं आहे. यावेळी त्याने खान कुटुंबीयांच्या रेस्टॉरंटमधील आवडत्या पदार्थांबद्दलही सांगितलं आहे. स्टीफन म्हणाला, “रेस्टॉरंटमध्ये खान कुटुंबीयांसाठी एक खास दरवाजा बनवण्यात आला आहे, जिथून शाहरुख खान व कुटुंबीय येत जात असतात. तर या दरवाज्याचा वापर खान कुटुंब सोडल्यास मोजकेच कलाकार करू शकतात असा नियम आहे.” पुढे तो म्हणाला, “खान कुटुंबीय अनेकदा इथे येत असतात. शाहरुख यांचा धाकटा मुलगा अबराम अनेकदा इथून जेवण ऑर्डर करत असतो. त्याला येथील सुशी हा पदार्थ खूप आवडतो, तर सुहाना व आर्यन त्यांच्या मित्रमंडळींसह अनेकदा या रेस्टॉरंटला भेट देत असतात. खान कुटुंबीयांनी त्यांची मॅनेजर पूजा ददलानीच्या लग्नाचा वाढदिवस इथे साजरा केला होता. 

शाहरुखही अनेकदा गौरीसह इथे येत असतात, तर लॅम्ब चॉप्स हा त्यांचा या रेस्टॉरंटमधील आवडता पदार्थ आहे.” स्टीफनने पुढे गौरीच्या आवडत्या पदार्थाबद्दल व तिचा रेस्टॉरंटच्या कामात कसा हातभार असतो याबद्दलही सांगितलं आहे. तो म्हणाला, “जेव्हा काही गोष्टी नीट घडत नाही तेव्हा गौरी आम्हाला सल्ले देते, पण आतापर्यंत सगळं सुरळीत सुरू राहिलं आहे आणि रेस्टॉरंटचे व्यवस्थापक व गौरी यांच्यामध्ये चांगले संबंध आहेत.” पुढे त्याने गौरीच्या आवडत्या पदार्थाबद्दल सांगितलं आहे. स्टीफन म्हणाला, “गौरीला करी हा पदार्थ खूप आवडतो, पण तो पदार्थ इतर ठिकाणीसुद्धा उपलब्ध असल्याने या रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ न ठेवण्याचं माझं मत होतं, पण गौरीचा आवडता पदार्थ असल्याने आम्ही त्याचा मेन्यूमध्ये समावेश केला आहे.”

Share this story