संग्रहित छायाचित्र
बाॅलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ‘मेरी जंग,’ ‘खलनायक,’ ‘ताल,’ ‘परदेस’ या गाजलेल्या या चित्रपटांचे दिग्दर्शक असलेल्या ७९ वर्षीय घई यांची प्रकृती चिंताजनक असल्याच्या बातम्या आल्या होत्या, तथापि, त्यांची पुतणी सुझाना घई यांनी सांगितले की कोणतीही गंभीर समस्या नाही. आता घई यांच्या टीमनेही अधिकृत निवेदन जारी करून त्याच्या आरोग्याबाबत अपडेट दिले आहे.
सुभाष घई यांच्या प्रवक्त्यांनी अधिकृत निवेदनात लिहिले की, ‘‘आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की सुभाष घई पूर्णपणे बरे आहेत. त्यांना नियमित तपासणीसाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती ठीक आहे. तुमच्या सर्व प्रेम आणि काळजीबद्दल धन्यवाद.’’ घई यांच्या निकटच्या सूत्रांच्या मतजे त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत आहे.
सुभाष घई यांचा जन्म २४ जानेवारी १९४५ रोजी नागपूर येथे झाला. त्याला लहानपणापासूनच अभिनेता व्हायचे होते, पण नशिबाने त्यांना यशस्वी दिग्दर्शक म्हणून स्थापित केले. राज कपूर यांच्यानंतर त्यांना इंडस्ट्रीतील दुसरे 'शो मॅन' म्हटले जाते.
घई यांनी त्यांच्या हिंदी चित्रपटसृष्टीत सुमारे १६ चित्रपटांचे लेखन आणि दिग्दर्शन केले. त्यापैकी १३ चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर हिट ठरले. २००६ मध्ये 'इकबाल' चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.
सुभाष घई यांनी त्यांच्या चित्रपटांमधून जॅकी श्रॉफ, रीना रॉय, मीनाक्षी, माधुरी दीक्षित, मनीषा कोईराला आणि महिमा चौधरी या कलाकारांना ब्रेक दिला होता. रोमँटिक, म्युझिकल, थ्रिलर, देशभक्ती असे सर्व प्रकारचे चित्रपट त्यांनी केले. 'कालीचरण', 'विश्वनाथ', 'कर्ज', विधाता, 'हिरो', मेरी जंग', 'कर्म', 'राम लखन', सौदागर', 'खलनायक', 'परदेस', ताल', 'यादें' यांचा त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे.
घई व्हिसलिंग वुड्स नावाची एक अभिनय संस्था चालवत आहेत. ही शाळा जगातील शीर्ष १० चित्रपट शाळांपैकी एक मानली जाते. या ॲक्टिंग स्कूलमध्ये ते नवीन कलाकारांना अभिनय आणि चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षण देत आहेत. सुभाष घई हे पहिले बॉलीवूड निर्माते आहेत ज्यांनी त्यांच्या ताल चित्रपटाद्वारे चित्रपट विमा पॉलिसी सुरू केली. चित्रपटांना बँकांकडून वित्तपुरवठा करण्याची संकल्पना सुरू करण्याचे श्रेयही त्यांना जाते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.