बी टाऊनचा लोकप्रिय अभिनेता सोनू सूद याच्या पत्नीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवने सोनू सूदची पत्नी सुखरुप असून चिंता करण्यासारखी बाब नसल्याचं सांगण्यात येत आले आहे. पण अपघात झालेल्या गाडीचा फोटो पाहिला असता हा अपघात किती भीषण हे समजते. अभिनेत्याच्या पत्नीच्या कारचा अपघात हा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनू सूद यांची पत्नी सोनाली सूद त्यांच्या दोन नातेवाईकांसह कारने नागपूरच्या दिशेने येत असताना सोनेगाव पोलीस स्टेशन समोरील उड्डाणपुलावर कार एका ट्रकसोबत धडकली. या अपघाताचे काही फोटो समोर आले आहेत. कारचा अक्षरशः चक्काचूक झाल्याचं दिसत आहे.
सोनाली सूद वाहन चालकाच्या बाजूच्या सीटवर समोर बसल्या होत्या.. मात्र अपघातानंतर एअर बॅग उघडले गेले आणि त्यामुळे सोनाली सूद आणि त्यांचे दोन्ही नातेवाईक जास्त जखमी झाले नाही. अपघातात कार पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. पण सुदैवाने धडकेनंतर एअरबॅग्ज उघडल्या गेल्या ज्यामुळे कोणतीही मोठी दुखापत झाली नाही. सोनू सूदच्या पत्नीला उपचारासाठी नागपूरच्या मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना 24 मार्च 2025 रोजी रात्री उशिरा घडली.
#WATCH | Nagpur, Mahrashtra | Sonu Sood's wife, Sonali Sood, and sister-in-law, Sunita, got injured in an accident on the flyover located on Wardha Road in Nagpur. The car in which Sonali Sood was sitting hit the truck from behind. The accident happened at 10.30 pm on Monday… pic.twitter.com/wJaBMHVPBx
— ANI (@ANI) March 25, 2025