'बाळासाहेबांनी एकट्याने शिवसेना घडवली, तशी तुम्ही पुन्हा'....आशा भोसलेंनी खास अंदाजात दिल्या एकनाथ शिंदेंना शुभेच्छा

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज त्यांचा (9 फेब्रुवारी) 61 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Dhanshri Otari
  • Sun, 9 Feb 2025
  • 02:41 pm
Entertainment, Bollywood, Entertainment News, Eknath Shinde , Singer, Asha Bhosale, Birthday, Asha Bhosale B'Day Wishes to Eknath Shinde,मनोरंजन, बॉलीवूड

The state's Deputy Chief Minister Eknath Shinde is celebrating his 61st birthday today (February 9).

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज त्यांचा (9 फेब्रुवारी) 61 वा वाढदिवस साजरा करत आहेत. देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावर होत आहे. अशातच ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी एकनाथ शिंदेंना त्यांच्या खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. 'जशी बाळासाहेबांनी एकट्याने शिवसेना घडवली, तशी तुम्ही पुन्हा एकट्याने शिवसेना घडवली, त्यामुळे मला तुमचा अभिमान आहे.' असं म्हणत आशा भोसलेंनी शिंदेंना शुभेच्छा दिल्या आहेत. 

आशा भोसले यांनी शनिवारी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती, त्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचा उल्लेख करत शुभेच्छा दिल्या आहेत. 

'जशी बाळासाहेबांनी एकट्याने शिवसेना घडवली, तशी तुम्ही...'

आशा भोसले यावेळी म्हणाल्या की, "तुम्ही मला फार आवडता. तुम्ही अचानक वरती आलात, आम्हाला माहित नव्हतं तुम्ही काम करत होतात. तुम्ही अचानक वर आलात आणि जशी बाळासाहेबांनी एकट्याने शिवसेना घडवली, तशी तुम्ही पुन्हा एकट्याने शिवसेना घडवली, त्यामुळे मला तुमचा अभिमान आहे. कारण, त्यावेळेला सगळं काही निवळलं होतं, त्यावेळी तुम्ही आलात. 

ज्या हिंमतीने तुम्ही आलात, लोकांच्या बोलण्याला तु्म्ही तोंड दिलं, सगळे तुमच्यावर धावून आले होते, त्यावेळी तुम्ही परिस्थितीला तोंड दिलं आणि यशस्वी झालात आणि आणखी यशस्वी व्हाल, असा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. शतायुषी व्हा आणि असंच कार्य करत राहा. चांगलं कार्य केल्याने कुणीही कधीही संपत नाही". असंही आशा भोसले यावेळी म्हणाल्या. 

वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातून अनेक शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी गर्दी केली आहे. आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उत्सुक आहेत. दरम्यान, राज्यातील लाडक्या बहीणींनी तब्बल 61 किलोचा केक दिला असल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे तर लाडका भाऊ, लाडका मुख्यमंत्री, एकनिष्ठ दिघे साहेबांचा शिवसैनिक असे अनेक टॅग केकवर लिहण्यात आलं आहेत. 

Share this story