संग्रहित छायाचित्र
मुंबई- अभिनेत्री क्रांती रेडकर ही मराठी इंडस्ट्रीमधली लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने आजवर अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले आहे. याशिवाय ती उत्तम डान्सर सुद्धा आहे. सध्या क्रांती सिनेमांमध्ये फारशी दिसत नसली, तरीही सोशल मीडियावरती प्रचंड सक्रिय असते. अनेकदा ती तिच्या मुलींसोबत भन्नाट व्हिडिओ शेअर करते.
पण त्यावेळी ती मुलींचा चेहरा दाखवणे कटाक्षाने टाळते. आपल्याला क्रांतीचं नाव क्रांती रेडकर हेच ठाऊक आहे. पण नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने तिच्या खऱ्या नावाचा खुलासा केला. क्रांतीने खरं आडनाव रेडकर नसून राणे असल्याचं सांगितलं. मुलाखतीमध्ये क्रांतीला विचारले की तुझं बालपण हे मुंबईतच गेलं मग तुझं मूळ गाव कुठलं? यावर क्रांतीने उत्तर दिले की, माझे आजोबा हे मालवणचे आहेत.
आणि आमचं कुलदैवत जे आहे ते रेड्डी ला आहे त्यामुळे आमचं खरं आडनाव राणे असा आहे. एकेकाळी आमचे जे राणे बांधव होते रेड्डी वरून निघाले आणि मालवणला येऊन स्थायिक झाले. म्हणजेच क्रांतीचे आधी आडनाव राणे होते मग ते रेडकर झाले. साधारण चार पिढ्यान पासून हे आडनाव आम्ही लावतो. क्रांती रेडकरचा जत्रा सिनेमा प्रचंड गाजला. या सिनेमातलं भरत जाधव आणि तिच्यावर चित्रित झालेले कोंबडी पळाली हे गाणे आजही सुपरहिट आहे. याशिवाय क्रांतीने श्रीमंत दामोदर पंत या नाटकात सुद्धा काम केले होते. या नाटकातही भरत जाधव मुख्य भूमिकेत होते.