संग्रहित छायाचित्र
'कॉन्ट्रोव्हर्सी गर्ल' अशी ख्याती असलेली राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका व्हिडिओमधून तिने थेट पाकिस्तानलाच जाण्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला आहे. हा व्हिडिओ राखीने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हातात पासपोर्ट घेऊन एयरपोर्टवर तिने हा व्हिडिओ शूट केला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तसेच या व्हिडिओखाली खूप साऱ्या मजेशीर कमेन्ट्स आल्या आहेत.
हा व्हिडिओ शूट करण्याचं कारण देखील तितकंच मजेशीर आहे. भारत टिकटॉक या सोशल मीडिया अॅपवर बंदी असल्याने राखीने नाराजी व्यक्त केली आहे. सगळ्या जगात लोक टिकटॉक करून पैसे कमावत आहे. मी स्वत: देखील दुबईत राहून टिकटॉक करून पैसे कमावते. पण मला दुबईत राहायचं नाही. मला भारतात यायचं आहे. भारतात मला टिकटॉक वर व्हिडिओ करायचे आहेत, असं राखीने या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
जगभरात सगळीकडे टिक टॉक सुरू आहे. मात्र भारतात टिक टॉकवर बंदी असल्याने राखी सावंतने व्हिडिओ बनवून नाराजी व्यक्त केली आहे. भारतात टिक टॉक बंद असल्यामुळे भारतात खूप सारे तरुण बेरोजगार बसलेले आहेत. त्यांच्यासाठी मोदी यांनी टिकटॉक भारतात सुरू करावे. म्हणजे त्या लोकांना त्यातून रोजगार मिळेल. मोदी यांनी टिकटॉक भारतात सुरू केले नाही तर पाकिस्तानात जाण्याचा इशारा तिने दिला आहे. तसेच पाकिस्तानात जावून तिथेच एखाद्या पाकिस्तानी मुलाशी लग्न करून सेटल होईल असे देखील तिने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
राखीने इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तिचा पासपोर्ट दाखवत ती म्हणत आहे की, मी पाकिस्तानला जात आहे. राखीच्या या व्हिडिओवर लोकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. कुणी म्हणतंय फटाफट निघून जा. तर एका युजरने तर बेहना, परत येवू नकोस, असं लिहिलं आहे.