संग्रहित छायाचित्र
रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांचा 'ॲनिमल' हा चित्रपट हिट ठरला. या चित्रपटासाठी संदीप रेड्डी वंगा यांची पहिली पसंती रश्मिकाऐवेजी परिणिती चोप्रा होती मात्र, परिणितीने हा चित्रपट करण्यास नकार देत अमर सिंगचा ‘चमकिला’ हा चित्रपट निवडला.
आता परिणितीने ‘ॲनिमल’ला नकार देण्याचे कारण सांगितले आहे. परिणिती आणि तिचा पती राघव चढ्ढा नुकतेच ‘आप की अदालत’मध्ये पोहोचले. रजत शर्मा यांच्याशी संवाद साधताना ती म्हणाली, ‘‘या चित्रपटातील रश्मिकाची भूमिका गमावल्याचा मला कोणताही पश्चात्ताप नाही. खरे सांगायचे तर, मला वाटते की देवाच्या मनात माझ्यासाठी काहीतरी चांगले होते. मी तो चित्रपट (अॅनिमल) करत होते आणि सर्व काही फायनल झाले होते, पण त्याचवेळी मला 'चमकिला' चित्रपटाची ऑफर आली. दोघांची तारीखही सारखीच होती. यात मी ‘चमकिला’ची निवड केली.
मला अनेक गाण्यांच्या ऑफर्स आल्या होत्या. मला एआर रहमानसोबत काम करण्याची संधीही मिळाली. एवढेच नाही तर इतरही अनेक चांगल्या संधी मला मिळाल्या. पण, इम्तियाज अली हा माझा ड्रीम डायरेक्टर आहे, त्यामुळे जेव्हा मला खूप काही करायला मिळत होते, तेव्हा मी ‘ॲनिमल’ऐवजी ‘चमकिला’ निवडले. मला या चित्रपटातून मिळालेले प्रेम, पाठिंबा, ओळख आणि आदर याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. ‘ॲनिमल’ नाकारल्याचा मला कोणताही पश्चात्ताप नाही. मी खूप आनंदी आहे, असे परिणितीने सांगितले.
राघव चढ्ढा यांनी सांगितले की, परिणितीने 'चमकिला' या चित्रपटात खूप चांगला अभिनय केला आहे. या चित्रपटामुळे आमचे नाते अधिक घट्ट झाले. जेव्हा परिणिती भारतात परतली तेव्हा ती चित्रपटाच्या शूटिंगसाठी थेट पंजाबला आली. यामुळे आम्हाला अनेकदा भेटण्याची संधी मिळाली, ज्यामुळे आमचे नाते आणखी घट्ट झाले.’’
‘ॲनिमल’ मागील वर्षी १ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. बाॅक्स ऑफिसवर या चित्रपटाने मोठे यश मिळवले. 'चमकिला' हा सिनेमा यावर्षी ओटीटीवर रिलीज झाला होता. या चित्रपटात परिणितीशिवाय पंजाबी गायक-अभिनेता दिलजीत दोसांझही दिसला होता.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.