काम नाही, मग बोल्ड सीन

बॉलीवूडमध्ये एन्ट्री मिळावी यासाठी अभिनेता असो वा अभिनेत्री खूप संघर्ष करावा लागतो. वेगवेगळ्या दिव्यातून जात यशासाठी संघर्ष करावा लागतो. काही अभिनेत्री कॉस्च्युमपासून प्रोटोकॉल पाळतात, तर काही जणी बिनधास्तपणे वावरत असतात. बोल्ड सीन असो किंवा बेडसीन त्या बिनधास्तपणे साकारत असतात.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 16 May 2025
  • 05:37 pm

संग्रहित छायाचित्र

बॉलीवूडमध्ये एन्ट्री मिळावी यासाठी अभिनेता असो वा अभिनेत्री खूप संघर्ष करावा लागतो. वेगवेगळ्या दिव्यातून जात यशासाठी संघर्ष करावा लागतो. काही अभिनेत्री कॉस्च्युमपासून प्रोटोकॉल पाळतात, तर काही जणी बिनधास्तपणे वावरत असतात. बोल्ड सीन असो किंवा बेडसीन त्या बिनधास्तपणे साकारत असतात.

सिनेमा, वेबसीरिजमध्ये बोल्ड, इंटिमेट सीन्स असणं आता फार आश्चर्याचं राहिलेलं नाही. ओटीटीवर तर सर्रास बोल्ड सीन्सचा भडिमार असतो. मात्र अनेक कलाकार काही वेळेस नाईलाजानेही असे सीन्स देतात.

बॉलीवूडची अभिनेत्री पत्रलेखाने नुकताच याचा खुलासा केला आहे. तिने करिअरच्या सुरुवातीला 'लव गेम्स' या सिनेमात बोल्ड सीन्स दिले होते ज्याची चर्चा झाली होती.

आता पत्रलेखाने त्या सिनेमात काम करणं ही मोठी चूक असल्याचं मान्य केलं आहे. आता ती तसे सिन्स करू शकणार नाही असंही म्हणाली.

माध्यमांशी बोलताना पत्रलेखा म्हणाली, की "नाही, मी पुन्हा तसे सीन आता देऊ शकत नाही. १० वर्षांपूर्वी जी पत्रलेखा होती ती खूप वेगळी होती. तेव्हा माझं वयही कमी होतं."

"तेव्हा माझ्यासाठी काम मिळणं महत्वाचं होतं. मी तेव्हा काम मिळवण्यासाठी खूप अस्वस्थ असायचे. अशा मानसिकतेतच मी तो सिनेमा केला. तेव्हा मला याची जाणीव झाली नाही."

"त्या सिनेमात काहीही चुकीचं नव्हतं. जे स्क्रिप्टमध्ये होतं तेच तसाच सिनेमा बनवण्यात आला. पण मी तेव्हा सिनेमाला न्याय देऊ शकले का? तर नाही. मी सिनेमासाठी योग्य व्यक्ती नव्हते."

"माझ्याकडून ती चूक झाली. सिनेमा हातातून जाईल म्हणून यात काम करायचं हे अयोग्य होतं याचा मी विचार करायला हवा होता. पण हेही तितकंच खरं आहे की माझ्याजवळ काम नव्हतं. त्यामुळे मी स्वत:ला जास्त दोष देणार नाही."

Share this story