संग्रहित छायाचित्र
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी तब्बल २० कोटी रुपयांच्या ऑफरला नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. ही ऑफर चक्क आघाडीचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी दिली होती. त्यांच्या आगामी 'SSMB29' या बिग-बजेट चित्रपटात नानांना महत्त्वाची भूमिका ऑफर करण्यात आली होती.
मात्र त्यांनी ही संधी सौम्य शब्दांत नाकारली. या चित्रपटात महेश बाबू आणि प्रियांका चोप्रा यांची मुख्य भूमिका आहे. या दोघांसोबत पृथ्वीराज सुकुमारन देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण जानेवारी २०२५ मध्ये सुरू झाले असून, अलीकडेच प्रियांका चोप्राने भारतात येऊन महेश बाबूसोबत हैदराबादमध्ये शूटिंगचे पहिले शेड्यूल पूर्ण केले.
वृत्ताच्या आधारे २०२४ च्या अखेरीस एसएस राजामौली स्वतः पुण्यात नाना पाटेकरांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यांनी चित्रपटाची संकल्पना, पटकथा सांगितली आणि नानांची लूक टेस्टही झाली. मात्र, नानांना भूमिका पुरेशी ठोस आणि समाधानकारक वाटली नाही.