प्रातिनिधिक छायाचित्र....
Mika Singh Post : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्या चर्चेत आहे. 16 जानेवारी रोजी एका चोराने त्याच्या घरात घुसखोरी केली होती. त्यादरम्यान सैफ हाणामारीत गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर एका रिक्षावाल्यानं सैफला रूग्णलयात पोहचवलं होते. त्यानंतर सैफ काही दिवसांच्या उपाचारानंतर लीलावती रुग्णालयातून घरी परतला आहे. यादरम्यान सैफनं त्याचा जीव वाचवणाऱ्या ऑटो रिक्षा चालकाची रूग्णालयात असताना भेट घेतली होती.
सैफने भेटीदरम्यान भजन सिंगचे कौतुक केले होते आणि त्याला म्हणाला की "जर तुला आयुष्यात कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर मला आवाज दे." सैफसोबत त्याची आई शर्मिला टागोर यांनीही भजन सिंग याबाबत कृतज्ञता व्यक्त केली होती. त्यानंतर आता आता मिका सिंगने त्या रिक्क्षा चालकाचे कौतुक केले आहे आणि त्याला 1 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे आणि त्याची माहिती मागितली आहे.
वास्तविक, मंगळवारी सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यापूर्वी, त्याच दिवशी त्यानं ऑटो रिक्षाचालक भजनसिंग राणाची भेट घेतली होती. याच भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान त्यानंतर मिका सिंगने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि त्यात म्हटले आहे की "भजन सिंगला 11 लाख रुपये मिळायला हवेत."
त्याने इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'भारताच्या आवडत्या सुपरस्टारचा जीव वाचवल्याबद्दल तो किमान 11 लाख रुपयांच्या बक्षीसास पात्र आहे असे मला वाटते.' त्याचे काम खरोखरच कौतुकास्पद आहे. शक्य असल्यास कृपया त्यांचे संपर्क तपशील माझ्यासोबत शेअर करा. मी त्याला 1 लाख रुपये देऊ इच्छितो."
मिका सिंगने 'सैफ अली खानची ऑटो ड्रायव्हरला 51 हजार रुपये देत असल्याची पोस्टही शेअर केली आहे.' त्याने सैफला आवाहन केले आहे की, "सैफ भाई, कृपया त्याला 11 लाख रुपये दे. तो खरा हिरो आहे. मुंबई ऑटोवाला जिंदाबाद." दरम्यान, मिकाची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.