मराठी सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते प्रकाश भेंडे यांचं निधन झालं आहे. सोमवारी २८ एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मराठी चित्रपट सृष्टी गाजवणाऱ्या दिवंगत अभिनेत्री उमा भेंडे यांचे प्रकाश पती होते. उमा भेंडे आणि प्रकाश भेंडे या दोघांनीही मराठी चित्रपटातून एकत्रित काम केले होते. त्यांच्या पश्चात प्रसाद आणि प्रसन्न ही दोन मुलं आहेत.
‘भालू’या चित्रपटात प्रकाश भेंडे अन् त्यांची पत्नी उमा भेंडे हेच नायक-नायिका होते. ‘भालू’ चित्रपटाला मोठं यश मिळाल्यानंतर अभिनय, निर्मिती, दिग्दर्शन अन् वितरण अशा चारही प्रकाश भेंडे यांनी आपला ठसा उमटवायला सुरुवात केली. प्रकाश यांनी त्यानंतर ‘चटकचांदणी’, ‘आपण यांना पाहिलंत का?’, ‘प्रेमासाठी वाट्टेल ते’, ‘आई थोर तुझे उपकार’ या चित्रपटांची निर्मिती केली.