Karishma Kapoor : ‘त्या’ कारणामुळे करिश्मा दु:खी होती...

अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि करिश्मा कपूरसोबत (Karishma Kapoor) ‘हां मैने भी प्यार किया’ या चित्रपटामध्ये केलेल्या एकत्र कामाविषयी दिग्दर्शक धर्मेश दर्शनने (Dharmesh Darshan) चर्चा केली आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांचे ब्रेकअप (Karishma break up) झाल्याचे दिग्दर्शकाने सांगितले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Sat, 28 Oct 2023
  • 03:51 pm
Karishma Kapoor

संग्रहित छायाचित्र

अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि करिश्मा कपूरसोबत (Karishma Kapoor) ‘हां मैने भी प्यार किया’ या चित्रपटामध्ये केलेल्या एकत्र कामाविषयी दिग्दर्शक धर्मेश दर्शनने (Dharmesh Darshan) चर्चा केली आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांचे ब्रेकअप (Karishma break up) झाल्याचे दिग्दर्शकाने सांगितले.

अमिताभ बच्चन Amitabh Bachchan) यांनी या चित्रपटाबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचेही त्यांनी सांगितले, तर जया बच्चन (Jaya Bachchan) यांना हा चित्रपट खूप आवडला होता. अक्षयकुमारनेही 'हां मैने भी प्यार किया'मध्ये अभिषेक आणि करिश्मासोबत स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटात अभिषेक-करिश्मा पहिल्यांदा एकत्र दिसले होते

'हां मैने भी प्यार किया' बाबत एका मुलाखतीत धर्मेश दर्शन म्हणाले, ‘‘अभिषेक आणि करिश्माने पहिल्यांदा एकत्र काम केलेला हा चित्रपट होता. या दोघांना चित्रपटात कास्ट करण्यात आले तेव्हा ते रिलेशनशिपमध्ये होते. पण शूटिंगदरम्यान त्यांचे नाते संपुष्टात आले. यामुळे करिश्मा खूप चिंतेत होती. यापूर्वी मी करिश्मासोबत ‘राजा हिंदुस्तानी’ मध्ये काम केले होते. त्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ती खूप आनंदी असायची, पूर्णपणे कामावर लक्ष केंद्रित करायची, पण वैयक्तिक अडचणींमुळे ती 'हां मैने भी प्यार किया' च्या शूटिंगदरम्यान गुमसुम असायची. दोघांमध्ये समेट घडवून आणणारा मी कोणी मानसोपचारतज्ज्ञ नव्हतो. मात्र, मी दोघांचेही बोलणे ऐकून घ्यायचो.’’

दिग्दर्शक धर्मेश पुढे म्हणाले की, ‘‘अमिताभ बच्चन यांनी चित्रपटाची कथा जुनी असल्याचे सांगितले होते. दुसरीकडे जया बच्चन यांना हा चित्रपट खूप आवडला.’’ करिश्मा आणि अभिषेक यांची जवळीक अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता हिच्या लग्नात वाढली होती. या दोघांनी २००२  मध्ये एंगेजमेंट केली होती. एंगेजमेंटनंतर एका कार्यक्रमादरम्यान जया बच्चन यांनी मीडियासमोर करिश्मा कपूरची सून म्हणून ओळख करून दिली होती, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे नाते तुटण्याचे कारणदेखील जया स्वतःच बनल्या. करिश्मा आणि अभिषेक एंगेजमेंटनंतर काही महिन्यांनी लग्न करणार होते, दरम्यान ‘‘लग्नानंतर सून चित्रपटात काम करणार नाही,’’ अशी जयांची अट होती, पण करिश्मा आणि तिची आई बबिता यांना हे मान्य नव्हते. याच कारणामुळे एंगेजमेंट झाली असूनही अभिषेक-करिष्माचे नाते तुटले.

एंगेजमेंट तुटल्यानंतर पुढच्याच वर्षी करिश्मा कपूरने २००३ मध्ये बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केले. लग्नाच्या काही वर्षानंतर करिश्मा आणि संजयमध्ये भांडणे सुरू झाली आणि २०१० मध्ये दोघे वेगळे राहू लागले. अखेर २०१६ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest