इन्स्टाक्वीन भाभीचा मृत्यू!

सोशल मीडिया इंफ्लूएन्सर आणि इन्स्टाग्रामवर भाभी नावाने प्रसिद्ध असलेल्या कमल कौर हिचा मृतदेह नको त्या अवस्थेत आढळला आहे. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये कमल कौर हिचा मृतदेह सजलेल्या अवस्थेत आढळल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 13 Jun 2025
  • 05:17 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune Newsz

संग्रहित छायाचित्र

सोशल मीडिया इंफ्लूएन्सर आणि इन्स्टाग्रामवर भाभी नावाने प्रसिद्ध असलेल्या कमल कौर हिचा मृतदेह नको त्या अवस्थेत आढळला आहे. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये कमल कौर हिचा मृतदेह सजलेल्या अवस्थेत आढळल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सोशल मीडियावर कमल कौर कायम सक्रिय असायची. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत कमल कौर चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करायची.

संबंधित घटना बुधवारी मध्यरात्री समोर आली. जेव्हा कमल कौर हिचा मृतदेह भटिंडा मेडिकल युनिव्हर्सिटीजवळील पार्किंगमध्ये बंद कारमध्ये आढळला. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, पोलिसांनीही तपास सुरू केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आला आहे. बुधवारी रात्री पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका संशयास्पद कारमधून तीव्र दुर्गंधी येत होती. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा कारमध्ये एका ३०-३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला.

तपास केल्यानंतर मृतदेह दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नाही तर, इंस्टाग्राम क्वीन भाभी कमल कौर हिचा आहे. आता ही हत्या की आत्महत्या? याचा शोध पोलीस घेत आहेत. कमलचे इंस्टाग्रामवर ३.५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. पंजाबमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएंसर म्हणून ती प्रसिद्ध आणि वादग्रस्त राहिली आहे. आता तिची शेवटची पोस्ट देखील तुफान चर्चेत आली आहे. स्वतःचा एक फोटो पोस्ट करत कमल कौर म्हणाली, ‘कोणतीच भावना नाही, प्रेम नाही… फक्त राहिला आहे तो म्हणजे संशय संशय, संशय…’. 

Share this story