गुजरात दंगल दाखवल्यामुळे आयटी नोटीस?

'एल टू : एम्पुरान' या चित्रपटाचे निर्माते अँटनी पेरुम्बवूर यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. या चित्रपटात गुजरात दंगल दाखवण्यात आल्यानण्केंद? सरकारच्या इशाऱ्यावरून ही नोटीस पाठवण्यात आल्याचे बोलले जात आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Machale
  • Mon, 7 Apr 2025
  • 04:41 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

'एल टू : एम्पुरान' या चित्रपटाचे निर्माते अँटनी पेरुम्बवूर यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. या चित्रपटात गुजरात दंगल दाखवण्यात आल्यानण्केंद? सरकारच्या इशाऱ्यावरून ही नोटीस पाठवण्यात आल्याचे बोलले जात आहे.

या नोटीसअंतर्गत पेरुम्बवू यांना या महिन्याच्या अखेरीस त्यांच्या 'लुसिफर' आणि 'मराक्कर : अरबिकादलिंटे सिंहम' या चित्रपटांशी संबंधित पैशांची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. अलीकडेच, अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन यांनाही नोटीस पाठवण्यात आली होती.

आयकर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही नोटीस 'एल टू : एम्पुरान' चित्रपटावरील वादामुळे नाही तर २०२२ मध्ये मल्याळम चित्रपट उद्योगात टाकण्यात आलेल्या छाप्यांच्या चौकशीचा एक भाग आहे. इतकेच नाही तर अँटनी यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये विशेषतः परदेशात वितरण हक्कांची आणि मोहनलाल यांना केलेल्या २.५ कोटी रुपयांच्या कथित देयकाची माहिती मागितली आहे, कारण या दोन्ही चित्रपटांमध्ये अभिनेता मोहनलाल होता.

अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन यांना ५ एप्रिल रोजी आयकर विभागाने नोटीस बजावली होती. यामध्ये त्यांना 'कडुवा', 'जन गण मन' आणि 'गोल्ड' साठी झालेल्या खर्चाची माहिती मागितली होती. यापूर्वी, 'एम्पुरान'चे सह-निर्माते आणि मल्याळम निर्माते गोकुलम गोपालन यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकण्यात आले होते.

या प्रकरणी पृथ्वीराज यांची आई आणि अभिनेत्री मल्लिका सुकुमारन यांनी नोटीसवर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाला, ‘‘माझ्या मुलाने काहीही चूक केलेली नाही. आम्हाला कोणत्याही चौकशीची भीती नाही.’’ २०२२ मध्ये आयकर विभागाने पृथ्वीराज यांच्या कर भरण्यात अनियमितता आढळल्याने त्यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापा टाकला होता. त्यावेळी आयकर विभागाने केरळम

Share this story