Miley Cyrus and Nick Jonas | निक जोनस अन् त्याची एक्स मिली सायरस.! १८ वर्षांनंतरही अजूनही....

निक हा बाॅलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबत सुखी वैवाहिक जीवन जगत आहे. अलिकडेच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये मिली निकसोबतच्या तिच्या नात्याबद्दल मोकळेपणाने बोलली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Machale
  • Tue, 10 Jun 2025
  • 12:46 pm
Entertainment News ,Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

miley cyrus & nick jonas

ग्रॅमी पुरस्कार विजेती अमेरिकन गायिका मिली सायरस हे संगीत विश्वातील एक मोठे नाव आहे. गाण्यांव्यतिरिक्त मिली तिच्या नात्यामुळेदेखील प्रसिद्धीच्या झोतात राहते. मिली १३ वर्षांची असताना ती निक जोनससोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यांचे नाते फक्त दोन वर्षे टिकले. जरी त्यांचे नाते दोन वर्षे टिकले तरी, मिली १८ वर्षांनंतरही निकला विसरलेली नाही. आपण अजूनही निकवर प्रेम करीत असल्याचे तिने सांगितले.

निक हा बाॅलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबत सुखी वैवाहिक जीवन जगत आहे. अलिकडेच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये मिली निकसोबतच्या तिच्या नात्याबद्दल मोकळेपणाने बोलली. तिने त्यांच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. दोघांनी २००६ मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. त्यांचे नाते २००९ पर्यंत टिकले, पण या काळात त्यांचे अनेकवेळा ब्रेकअप झाले. त्यांचे नाते ज्या पद्धतीने संपले त्यावर ती खूश नव्हती. मिली म्हणते, ‘‘आताही मला निक आवडतो. मी त्याच्यावर प्रेम करते. पण आता तो विवाहित आहे आणि वडीलही झाला आहे. आम्ही दोघेही आमच्या आयुष्यात पुढे गेलो आहोत.’’

मिली पॉडकास्टमध्ये सांगते की जेव्हा ती आणि निक जोनस एकत्र होते तेव्हा निकने तिला त्याच्या संगीत दौऱ्यात समाविष्ट केले नव्हते. निक त्याच्या कामावर लक्ष केंद्रित करू लागला. तो डिस्नेपासून स्वतःला वेगळे करत होता. मला तो माझ्यासोबत दौऱ्यावर यावा असे वाटत होते पण तो त्याच्या बँडसोबत दौऱ्यावर जात होता. यामुळे दोघांमध्ये भांडणे होत होती. यामुळे तिचे मन तुटले. तिला असे वाटू लागले की निक तिच्यापासून दूर जात आहे आणि तिला हे नको होते. तिने निकला विचारले की तो तिला का सोडून जात आहे? ते एकत्र संगीत दौरा करू शकत नाहीत का? पण मिलीला समजले की निक आयुष्यात पुढे गेला आहे.

२०१६ मध्ये निकने प्रियंकाला ट्विटरवर मेसेज केला, त्यानंतर त्यांचा प्रेमसंबंध सुरू झाले. या किशोरवयीन ब्रेकअपनंतर मिलीच्या आयुष्यात अनेक लोक आले. त्याच वेळी, सेलेना गोमेझ, ऑस्ट्रेलियन गायिका डेल्टा गुड्रेम, मिस युनिव्हर्स २०१२ ऑलिव्हिया कल्पो यांना डेट केल्यानंतर निक जोनसने प्रियंका चोप्रासोबत लग्न केले. निकने २०१८ मध्ये प्रियंकासोबत लग्न केले. दोघांनाही आज मालती मेरी ही मुलगी आहे. त्याच वेळी, मिलीने २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियन अभिनेता लियाम हेम्सवर्थशी लग्न केले. हे नाते अवघ्या दोन वर्षात तुटले. सध्या मिली अमेरिकन संगीतकार मॅक्स मोरांडोसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

Share this story