सग्रहीत छायाचित्र
भारताचा स्टार क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि यूट्यूबर/डान्सर धनश्री वर्मा यांच्या वैवाहिक जीवनाचा शेवट झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गुरुवारी (दि.20) वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने त्यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली. दोघे डिसेंबर 2020 मध्ये विवाहबद्ध झाले होते. आता दोघे कायदेशीररित्या वेगळे झाले आहेत.
हार्दिक-नताशानंतर क्रिकेट आणि कला विश्वातील आणखी एका जोडप्याचा आज घटस्फोट झाला. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा लग्नानंतर ४ वर्षांनी विभक्त झाले आहेत. युजवेंद्र चहल याची बाजू मांडणारे वकिल नितीन कुमार गुप्ता यांनी सांगितले, "घटस्फोटाचा अंतिम निकाल देण्यात आला आहे. दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे म्युच्यूयल डिव्होर्स साठी अर्ज केला होता. आज त्यावर घटस्फोटाचा हुकूमनामा ( Divorce Decree) देण्यात आला आहे. आज या दोघांचे लग्न कायदेशीरपणे संपुष्टात आले आहे. आता ते दोघे त्यांच्या आयुष्यातील निर्णय घेण्यासाठी एकमेकांपासून स्वतंत्र आहेत." यानंतर पत्रकारांनी त्यांना पोटगीचा प्रश्न विचारला. यावर 'काहीच नाही' म्हणत त्यांनी उत्तर देणं टाळलं.