संग्रहित छायाचित्र
मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध बालकलाकार मायरा वायकुळ हिने केलेले ख्रिसमस स्पेशल फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मराठी मालिकेत ‘परी’ या भूमिकेमुळे मायरा घराघरात पोहोचली. आठ वर्षीय मायराला ख्रिसमस हा सण खूप आवडतो. डिसेंबर महिना आला की तिला ख्रिसमसचे वेध लागतात. मायराने नुकतेच ख्रिसमसनिमित्त कुटुंबाबरोबर सुंदर फोटोशूट केले. आई-वडील आणि लहान भावासोबत मायराने हे फोटोशूट केले आहे. जगभरात येशूचा जन्मदिवस म्हणून २५ डिसेंबरला हा दिवस जगभरात साजरा केला जातो.
‘माझी तुझी रेशीमगाठ’ नंतर ‘नीरजा : एक नयी पहचान’ या हिंदी मालिकेत तिला संधी मिळाली. यातील तिच्या कामाचे कौतुक झाले. ‘नाच गं घुमा’ या मराठी चित्रपटात तिने मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सारंग साठ्ये, सुकन्या मोने, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत या दिग्गजांसोबत काम केले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.