अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआयकडून कोर्टात क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. सुशांत सिंहचा मृत्यू ही आत्महत्याच असल्याचं सीबीआयच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे या प्रकरणात जिच्यावर संशय होता त्या रिया चक्रवर्तीला क्लीन चिट मिळाली आहे. सुशांत सिंह राजपूत 14 जून 2020 रोजी वांद्रे येथील त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला होता. सुशांत सिंह राजपूतची हत्या नव्हे तर आत्महत्याच असल्याचे समोर आले आहे. कुठलाही पुरावा न सापडल्याने सीबीआयने तपास बंद केला आहे. सीबीआयने तब्बल 4 वर्षे 4 महिन्यांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे.
सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला अनेक वर्ष झाली आहेत. 14 जून 2020 मध्ये सुशांत याने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. करीयर यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्याने स्वतःला संपवलं. त्यामुळे त्याचे मृत्यूचे गूढ वाढले होते. गेली साडे चारवर्षे तपास सुरू होता. अखेर सीबीआयने क्लोजर रिपोर्ट मुंबई कोर्टात दाखल केला असून अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांना क्लीन चिट देण्यात आली आहे.
रिया चक्रवर्ती सुशांत सिंह राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, दोघांनीही आपले नाते अधिकृत केले नव्हते. 2020 मध्ये, 14 जून रोजी सुशांत त्याच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला तेव्हा सर्वत्र खळबळ उडाली होती. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात ड्रग्जचा अँगलही समोर आला. तपासात एनसीबी आणि ईडीच्या रडारवर रिया चक्रवर्तीही आली. सुशांतच्या कुटुंबीयांनी रियावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात अभिनेत्री मुख्य आरोपी मानली जात होती, तेव्हा तिला एक महिना भायखळा तुरुंगात काढावा लागला होता. अखेर सीबाआयने या प्रकरणी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांना दिली क्लीन चिट देण्यात आली आहे.
सीबीआयने फाइलचा क्लोजर रिपोर्ट मुंबई कोर्टात दाखल केला आहे. सुशांतचा 2020 मध्ये मृत्यू झाला. सीबीआयने तब्बल 4 वर्षे 4 महिन्यांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. सीबीआयने रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांना क्लीन चिट दिली आहे.
सीबीआयच्या अहवालात काय म्हटलं आहे?
1. सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली होती, त्याला आत्महत्येसाठी कोणीही जबरदस्ती केली नाही.
2. रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला क्लीन चिट मिळाली.
3. या प्रकरणी कोणताही गुन्हेगारी अँगल किंवा 'फाऊल प्ले' आढळला नाही.
4. AIIMS फॉरेन्सिक टीमनेही हत्येची शक्यता नाकारली.
5. सोशल मीडिया चॅट्स अमेरिकेत पाठवून तपास केला. त्यामध्ये छेडछाड केल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही.