संग्रहित छायाचित्र
प्रीती झिंटा ही बॉलीवूडमधील यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. १९९८ मध्ये अभिनेत्रीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘दिल से’ हा तिचा पहिला चित्रपट होता.
‘दिल चाहता है’,‘क्या कहना’ अशा अनेक तिचे लोकप्रिय चित्रपट आहेत. मात्र, तिचा ‘कल हो ना हो’ हा चित्रपट आजही लोकप्रिय आहे. या चित्रपटात शाहरुख खान, सैफ अली खान, जया बच्चन, सोनाली बेंद्रे असे अनेक कलाकार महत्वाच्या भूमिकेत होते. प्रीतीच्या बॉयफ्रेंडचा अपघातात झालेला मृत्यू ‘कल हो ना हो’या चित्रपटातील नैना, अमन व रोहित यांची ही गोष्ट प्रेक्षकांना भारावून टाकते. नैनाचे पहिले प्रेम अमनचे निधन झाले होते. त्यानंतर रोहित व नैना लग्न करतात. पण, त्यांच्या मनात अमनच्या आठवणी शेवटपर्यंत राहतात. अशा आशयाची गोष्ट पाहायला मिळाली. मात्र, चित्रपटातच नाही तर खऱ्या आयुष्यातही प्रीतीने तिचे पहिले प्रेम गमावले आहे. अभिनेत्रीने नुकतेच सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर आस्क मी एनिथिंग हे सेशन घेतलेले.