‘बिग बॉस’ आणि ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ फेम अभिनेत्री निक्की तांबोळीबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तिची प्रकृती बिघडली असून तिला आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले होते. याचा खुलासा निक्कीने स्वतः एका मुलाखतीत केला आहे.
निक्की तांबोळी नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असते. निक्की कायमच तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल जाहीरपणे सांगत आली आहे. अशातच, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत निक्कीने धक्कादायक खुलासा केला आहे.
निक्की तांबोळी 2 दिवस आयसीयूत
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत निक्की म्हणाली, माझी प्रकृती बिघडली होती हे कोणालाच माहिती नाही. मी याविषयी सोशल मीडियावरही काही पोस्ट केलं नाही. 4 दिवसांपूर्वी मी आयसीयु मध्ये अॅडमीट होते. मी एका रेस्टॉरंटमद्ये मित्रांसोबत जेवायला गेले होते. तिथं मी शेलफिश खाल्ला. पण त्याची मला अॅलर्जी होईल हे माझ्या लक्षात आलं नाही.
निक्कीची प्रकृती बिघडली होती
त्यादिवशी मी 4 मोठे प्रॉन्स खाल्ले. त्यामुळं माझ्या शरिरावर त्याचा परिणाम झाला. माधी फुफ्फुस काम करायची बंद झालं. माझे डोळे सुजले. फेस आला. संपूर्ण अंगावर खाज येत होती. शरीराच्या आतील ऑर्गन्स सुजल्यामुळं एकमेकांसोबत चिकटले गेले आणि माझा श्वास जवळपास थांबला होता. अशी धक्कादायक माहिती निक्कीने दिली.
निक्कीने पुढे सांगितले की, ही एक आपत्कालीन केस होती आणि तिला व्हीलचेअरवर नेण्यात आले आणि डॉक्टरांनी लगेच सांगितले की तिला आयसीयूमध्ये दाखल करावे लागेल.
अभिनेत्रीला त्वरित काही औषधे देण्यात आली जी आपत्कालीन परिस्थितीत दिली जातात आणि २ दिवस आयसीयूमध्ये ठेवण्यात आली. निक्की तांबोळी म्हणाली की तिला असे वाटले की तिच्यावर वाईट नजर आहे. त्यावेळी तिचा प्रियकर किंवा तिचे कुटुंब तिच्यासोबत नव्हते.