संग्रहित छायाचित्र
बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा त्याच्या चित्रपटांमुळे चांगलाच चर्चेत असतो. आमिरचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. लाल सिंह चढ्ढा चित्रपट फ्लॉप गेल्यापासून आमिर खान हा मोठ्या पडद्यापासून दूर आहे. त्याने स्पष्ट सांगितले होते की, सतत चित्रपटांचे शूटिंग आणि प्रमोशन यामुळे मी गेल्या काही वर्षांपासून कुटुंबीयांना अजिबातच वेळ देऊ शकलो नाहीये. यामुळे मी पुढील काही दिवस फक्त कुटुंबीयांना वेळ देणार आहे. मुळात म्हणजे लाल सिंह चढ्ढा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आमिर खानला मोठा धक्का बसला. आमिर खान हा परत एकदा कामावर परतलाय. आमिर खान याने नुकताच त्याच्या वयाबद्दल मोठा खुलासा केला. आमिर खान हा मुंबईत आयोजित वर्ल्ड पिकलबॉल लीगमध्ये सहभागी झाला. त्यावेळी आमिर खान आणि अली फजल यांच्यामध्ये सामना रंगला. यानंतर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरे देताना आमिर खान दिसला. यावेळी त्याला त्याच्या वयाबद्दल थेट प्रश्न विचारण्यात आला. मात्र, हा प्रश्न विचारल्यानंतर तो नाराज झाल्याचे बघायला मिळाले.
टोला मारत आमिर खान म्हणाला की, मला तर माहितीच नव्हते मी ६० चा आहे. मी १८ चाच आहे. त्यानंतर एकाने म्हटले की, सर वय फक्त नंबर आहे. त्यावर आमिर म्हणाला तो नंबर १८ आहे. वयाचा प्रश्न विचारताच आमिर खान नाराज झाल्याचे बघायला मिळाले. आपण १८ चेच असल्याचे म्हणताना आमिर खान हा दिसला. आमिर खान नेहमीच त्याच्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसतो. त्यामध्ये त्याला ६० वयाचे म्हटल्यावर राग आला.
आमिर खान हा त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत दिसतोय. आमिर खान याने किरण रावसोबत घटस्फोट घेऊन बरेच दिवस झाले आहेत. एका साऊथ इंडियन मुलीला आमिर खान डेट करत असल्याची जोरदार चर्चाही रंगताना दिसली. मात्र, त्यावर अजिबात भाष्य आमिर खान याने केले नाहीये. काही दिवसांपूर्वीच आमिर खान एक्स पत्नी किरण राव हिच्यासोबत चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसला. किरण रावने थेट सांगितले होते की, तिचे आणि आमिरचे नाते सध्या कसे आहे.