राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची फेर पडताळणी करण्यात येणार आहे. विविध माध्यमातून काही अपात्र लाभार्थीदेखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं विभागाला समजलं आहे. तसेच लाडक्या बहिणीच्या घरी चारचाकी आहे काय याची तपासणी होणार असून त्यानुसार बहिणीला अपात्र ठरवलं जाणार आहे. त्यामुळं लाडक्या बहिणींना चारचाकी डोकेदुखी ठरणार आहे. या योजनेबाबत नविन निकष आल्यामुळं अनेक हजारो बहिणींना लाभ मिळणार नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, योजनेच्या लाभार्थ्या बहिणीकडे चारचाकी असेल तर त्या अपात्र ठरणार आहेत. त्यांच्या घरी चारचाकी आहे नाही याची तपासणी होणार आहे. यासाठी अंगणवाडी सेविकांवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. सरकारच्या आदेशानुसार, अंगणवाडी सेविका लाभ घेणाऱ्या बहिणींच्या घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत. महिला व बालविकास विभागाने यासंदर्भात आदेश दिलं आहेत. तसचे, चारचाकी वाह असणाऱ्यांची यादी परिवह विभागाकडून मागवण्यात आली आहे. त्याद्वारे बहिणींच्या घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार हे.
नवं निकष नेमकं आहेत तरी काय?
संजय गांधी निराधार योजनेसारख्या अन्य योजनेचा लाभ घेतलेले नसावा.
कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा तसेच प्राप्तिकर भरणारा नसावा.
कुटुंबाच्या नावावर चारचाकी वाहन असल्यास अपात्र ठरेल.
महिलेचे वय 18 ते 65 वर्षाच्या दरम्यान असावे.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत असावे.
विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशामागे या योजनेचं मोठ योगदान आहे. मात्र सत्तेमध्ये येताच महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची फेर पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं महिला वर्गात नाराजीचं वातावरण पाहायला मिळत आहे.