संग्रहित
राज्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर उत्तरेकडील थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळं राज्यात गेल्या चार दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, सध्या धुळ्यात सर्वात कमी म्हणजे 4.4 अंश तापमानाची नोंद झाली आहे. तसेच धुळ्यासोबत जळगाव आणि विदर्भातदेखील हुडहुडी भरली आहे.
मध्य महाराष्ट्रातील आहिल्यानगर, जळगाव, नाशिक तर मराठवाड्यातील परभणी कृषी विद्यापीठ आणि विदर्भातील नागपूर, गोंदिया, ब्रम्हपुरी, वर्धा, भंडारा येथे किमान तापमानाचा पारा 10 अंशाच्या खाली घसरला आहे. गुरुवारी रत्नागिरी येथे 33.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. आज राज्याच्या किमान तापमानात काहीशी वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असला तरी गारठा कायम राहणार आहे.
तर पुण्यात पुढील दोन दिवस धुके पडणार पण वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने वर्तवली आहे.