संग्रहित छायाचित्र
सैफ अली खानवर खरंच हल्ला झाला की तो अॅक्टिंग करतोय असा संशय असल्याचं वक्तव्य मंत्री तथा भाजपा आमदार नितेश राणे यांनी केले आहे.
गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुंबईतील वांद्रे येथील इमारतीत असलेल्या घरात सैफ अली खानवर हल्ला झाला होता. सैफ अली खानच्या घरात घुसलेल्या आरोपीने सैफवर चाकूने सपासप वार केले होते. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर सैफ अली खानला मुंबईतील लीलावती रुग्णालय दाखल करून त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
या सगळ्या घटनेवर प्रतिक्रिया देताना नितेश राणे यांनी संशय व्यक्त केला आहे. राणे म्हणाले, बांग्लादेशी सैफ अली खानच्या घरात घुसले. नालायकपणा किती आहे. आधी फक्त नाक्यावर उभे रहायचे. आता घरात घुसायला लागले आहेत. कदाचित त्याला घेऊन जायला आले असतील. सैफ बाहेरुन असा चालत होता की, मलाच संशय आला याला खरच कोणी चाकू मारला की हा अॅक्टिंग करुन बाहेर पडला. असं टुणटुण करुन” असं राणे एका भाषणात म्हणाले.
दरम्यान, याआधी शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी देखील अशाच प्रकारे सैफ अली खान हल्ला प्रकरणात संशय व्यक्त केला होता.
काय म्हणाले होते संजय निरुपम?
"डॉक्टरांनी म्हणणं होतं की, सैफ अली खानच्या पाठीत चाकू 2.5 इंच आत घुसला होता. कदाचित तो आत अडकला असावा. हे ऑपरेशन सलग 6 तास चालले. हे सर्व 16 जानेवारी रोजी घडले. आज 21 जानेवारी आहे. हॉस्पिटलमधून बाहेर पडताच इतका तंदुरुस्त झाला? फक्त 5 दिवसात? कमाल आहे!"