संग्रहित
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा संशिय आरोपी वाल्मिक कराडला मध्यरात्री रुग्णालयात दाखल केले असुन त्याच्यावर आयसीयुमध्ये उपचार सुरु आहेत. कराडला न्यायालयाने काल 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर कराडला किमान सहा महिने तरी तुरुंगवास भोगायला लागणार अशी चर्चा सुरु झाली आहे. अशातच, त्याची बिघडलेली प्रकृती पाहत पुढे नेमकं काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष वेधलं आहे.
न्यायालयाच्या निर्णयानंतर कराडला कोठडीत ठेवण्यात आलं, बुधवारी मध्यरात्री अचानक त्याच्या पोटात दुखू लागल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास दाखल करण्यात आलं. मात्र प्रकृती नाजूक असल्यानं त्याच्यावर आयसीयुमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत.
काल झालेल्या सुनावणी दरम्यान, कराडच्या वकिलांनी त्याला स्लीप एपनिया आजार असून CPAP मशीनची गरज असल्याच्या सांगितलं. वकिलांच्या मागणीनुसार न्यायालयाने कराडला CPAP मशीन देण्याची मागणी मान्य केली आहे.
अवादा कंपनीच्या मॅनेजरला 2 कोटी खंडणी मागितल्याचा आरोप वाल्मिक कराड याच्यावर करण्यात येत आहे. खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी वाल्मिक कराड याला बीड न्यायालयानं न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर कराडचे वकील जामिनासाठी कोर्टात गेलं तरी मकोका अंतर्गत कारवाईत किमान 180 दिवस आरोपीला जामीन मिळू शकत नाही.