Ranjit Kasle Arrest : निलंबित पीएसआय रणजित कासलेला पोलिसांनी घेतले ताब्यात

पुण्यात आल्यानंतर कासले माध्यमांशी संवाद साधताना धनंजय मुंडेंनी माझ्या खात्यावर 10 लाख रुपये पाठवल्याचा खुलासा मेसेज दाखवत केला होता.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Dhanshri Otari
  • Fri, 18 Apr 2025
  • 10:27 am
Police,Dhananjay Munde,walmik karad,Ranjit Kasle, Pune arrest, Suspended PSI, Maharashtra police, Police corruption, PSI arrest, Pune crime news, Police suspension, PSI Pune

वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरचा ऑफर मिळाल्याचा दावा करणारा निलंबित पीएसआय रणजित कासलेला अखरे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात असणाऱ्या हॉटेलमधून आज(शुक्रवार) पहाटे त्याला ताब्यात घेण्यात आले. पुण्यात आल्यानंतर कासले माध्यमांशी संवाद साधताना धनंजय मुंडेंनी माझ्या खात्यावर 10 लाख रुपये पाठवल्याचा खुलासा मेसेज दाखवत केला होता. मतदानाच्या दिवशी ईव्हीएमपासून दूर राहण्यासाठी मला हे पैसे देण्यात आले होते, असा दावा कासले याने केला आहे.  

बीड पोलिसांनी रणजित कासले यांना पुण्यातील एका हॉटेलमधून ताब्यात घेतलं. रणजित कासले गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत होता. गेल्या काही दिवसांपासून पोलिस त्यांचा शोध घेत होते. दोन दिवसांपूर्वी रणजित कासले याने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत लवकरच मी शरण येणार असल्याचे सांगितले होते. काल रात्री पुण्यात आल्यानंतर त्याने माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी पुण्यातील किंवा बीड मधील पोलिसांना शरण जाणार असल्याचे म्हटलं होतं मात्र त्याआधीच बीड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.

एन्काऊंटरची ऑफर बंद दाराआड;  पुणे विमानतळावर कबुली

पुण्यात गुरुवारी रात्री माध्यमांशी संवाद साधताना  निवडणुकीच्या काळात त्याची ड्युटी परळी विधानसभा मतदारसंघात होती. त्यावेळी त्याला ईव्हीएम मशीनपासून दूर राहण्यासाठी धनंजय मुंडेंनी 10 लाख रुपये दिले. कासले याने हा आरोप करताना आपले बँक स्टेटमेंट देखील दाखवले. ईव्हीएम मशीनशी छेडछाड होईल मी गप्प बसावे म्हणून मला पैसे देण्यात आले. मुंडे चुकीच्या पद्धतीने निवडून आले असल्याचा दावाही यावेळी कासलेने केला. 

तसेच, त्याला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरी ऑफर होती यासंदर्भात माध्यमांनी कासलेला प्रश्न उपस्थित केला असता एन्काऊंटरचे आदेश हे उघडपणे दिले जात नाहीत. याबाबत बंददाराआड चर्चा होत असते. असं उत्तर देत अधिक कासले अधिक बोलण टाळलं. 

संत बाळूमामा कंस्ट्रक्शन कंपनी ही वाल्मिक कराडच्या मालकीची आहे. या कंपनीत महादेव कराड आणि काळे हे पार्टनर आहेत. त्यांच्या कंपनीतून माझ्या बँक खात्यावर दहा लाख रुपये आले होते. यातले साडे सात लाख रुपये मी परत केले आहेत. उर्वरित पैशातून माझा खर्च चालू आहे, असही यावेळी कसलेने सांगितले.  बीड पोलिस दलात कार्यरत असताना गुजरातमध्ये जाऊन खंडणी मागितल्या प्रकरणी रणजित कासले याला निलंबित करण्यात आले आहे. 

Share this story

Latest