संग्रहीत छायाचित्र
वारकऱ्यांना टोलमाफी देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना टोलमाफी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या संदर्भातील निर्णय जारी करण्यात आला आहे. १८ जून ते १० जुलै दरम्यान वारकऱ्यांना ही टोलमाफी दिली जाणार आहे. 10 मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गांवर टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. पंढरपूर वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना टोल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
18 जून ते 10 जुलैदरम्यान पालखी मार्गावर वारकऱ्यांना टोलमाफी मिळणार आहे. 10 मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गांवर सरकारने टोलमाफीचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या संदर्भातील निर्णय जारी करण्यात आला आहे. शासनाच्या निर्णयानुसार टोल नाक्यावर वारकरी, मानाच्या पालख्या आणि भाविकांना टोलमाफी मिळणार आहे. जड आणि हलक्या वाहनांना या टोलमाफीचा फायदा होणार आहे. त्यासाठी गाडी क्रमांक, चालकाचे नाव नोंद करून त्याचे स्टिकर्स परिवहन विभाग, पोलिस किंवा आरटीओ यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.