Dhananjay Munde: धनंजय मुंडेंविरोधात कोर्टानं उचललं मोठं पाऊल; अडचणी वाढल्या

मंत्री पदाचा राजीनामा अटळ असल्याची चर्चा राज्यभर सुरु असतानाच परळीच्या फौजदारी न्यायालयाने मुंडेंविरोधात मोठं पाऊल उचललं आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Desk User
  • Thu, 13 Feb 2025
  • 02:42 am
 dhanajay munde on karuna sharma petition, Dhananjay Munde, Dhananjay Munde, Karuna Munde

मंत्री धनंजय मुंडे गेल्या काही दिवसांपासून अडचणीत सापडले आहेत. त्यामुळं त्यांच्या मंत्री पदाचा राजीनामा अटळ असल्याची चर्चा राज्यभर सुरु असतानाच परळीच्या फौजदारी न्यायालयाने मुंडेंविरोधात मोठं पाऊल उचललं आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडविल्याबाबत करुणा मुंडे यांनी याचिकी दाखल केली होती.तक्रारीच्या अनुषंगाने परळीच्या फौजदारी न्यायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांना न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. याप्रकरणी 24 फेब्रुवारी 2025 रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.  

नेमकं प्रकरण काय? 

धनंजय मुंडे यांनी 2024 मध्ये परळी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी दाखल उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि तीन मुली तसेच करुणा मुंडे यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता. 

परंतु करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नव्हता. त्यांनी वरील खरी माहिती दडविल्याबाबत करुणा मुंडे यांनी बीड येथून परळीच्या फौजदारी न्यायालयात ऑनलाइन तक्रार केली होती. तक्रारीची मूळ कागदपत्र पाच फेब्रुवारी रोजी न्यायालयासमोर दाखल केली.

मागील महिन्यात,कोर्टाच्या सुनावणीदरम्यान, घरगुती हिंसाचार प्रकरणात मुंडे दोषी ठरले आहेत.   करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप कोर्टाने अंशत: मान्य केले असून दरमहा 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश फॅमिली कोर्टाने दिले आहेत. 

Share this story

Latest