Advertisement

Rohit Pawar : हजारो कोटींची मनी लाँड्रिंग; रोहित पवारांचा मोठा दावा; भोंदू अशोक खरातने हवालाच्या माध्यमातून ऑस्ट्रेलिया, दुबईत पाठविला पैसा

मुंबई : Rohit Pawar गेल्या काही दिवसांपासून भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची मोठी चर्चा सुरू आहे. या भोंदू अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केले असून तो सध्या कोठडीत आहे. भोंदू अशोक खरातची एसआयटीद्वारे चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

या भोंदू अशोक खरातबरोबर राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांचेही फोटो समोर आले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणावरून दररोज राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता अशोक खरात प्रकरणाच्या चौकशीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मोठी मागणी केली आहे.

अशोक खरात प्रकरणाची केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. याबाबत त्यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत सविस्तर भाष्य केलं आहे. तसेच ऑस्ट्रेलिया, दुबईसह आणखी चार ते पाच देशांत खरात हवालाच्या माध्यमातून हजारो कोटींची मनी लाँड्रिंग करत असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला आहे.

खरात हा केवळ भोंदू नाही तर एक नेक्सस आहे
‘भोंदू अशोक खरात ऑस्ट्रेलिया, दुबईसह चार ते पाच देशांत हवालाच्या माध्यमातून मनी लाँड्रिंग करत असल्याची आणि तसंच अशोक खरातने भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट राजकीय नेत्यांचे हजारांहून अधिक कोटी या देशांमध्ये पाठवले असल्याचे कळत आहे. अशोक खरात हा केवळ भोंदू नाही तर एक नेक्सस आहे. त्यामुळे या प्रकरणाची केंद्रीय तपास संस्थानी सुद्धा चौकशी करणे गरजेचे आहे. हा विषय राष्ट्रीय सुरक्षेला सुद्धा आवाहन देणारा असल्याने राज्य सरकारकडे पुरेसे पुरावे आले असतील तर गृह विभागाने देखील या प्रकरणाचा राजकीय गोळाबेरजेसाठी वापर न करता सखोल चौकशी केली पाहिजे. या प्रकरणातही ईडी सारख्या यंत्रणांना जाग येईल ही अपेक्षा’, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

Pune News : रास्ता पेठेतील ख्राईस्ट चर्चमध्ये गुड फ्रायडेच्या प्रार्थना सभेत गोंधळ

Next Post
Piyush Mishra

Piyush Mishra : ७ वीत असताना नातेवाईक महिलेकडून शोषण, तर शाळेतल्या शिक्षिकेला एकांतात किस; बॉलिवूड अभिनेत्याचे धक्कादायक खुलासे चर्चेत