Maharashtra, Pune, GBS
गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम पुण्यात दहशत निर्माण केली आहे. अनेकजण या आजाराला बळ पडले असून लागण झालेल्या संख्या 163 वर पोहोचली आहे. जीबीएसच्या संशयित रुग्णांपैकी 32 रुग्ण पुणे महापालिका हद्दीतील, 86 समाविष्ट गावातील, 18 पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील, 19 रुग्ण ग्रामीण हद्दीतील तर आठ इतर जिल्ह्यातील आहेत. दरम्यान, पाणी पुरवठा उपायुक्त नंदकुमार जगताप यांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे. गुइलेन बॅरे सिंड्रोम या जीवाणूचा संसर्ग हा प्रामुख्याने दूषित पाण्यातून होत असल्याची माहिती पाणी पुरवठा उपायुक्तांनी दिली. तसेच यासंदर्भात योग्य ती तपासणी सरु असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले पाणी पुरवठा उपायुक्त?
जीबीएस आजार नेमका कशामुळं होतो याची चाचणी करण्यासाठी विविध भागातून पाण्याचे साडेआठशे नमुने घेण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा उपायुक्तांनी दिली. यावेळी पहिल्यांदा महापालिकेचे टाकीतल्या पाण्याचे नमुने घेण्यात आलं. त्याचा रिझल्ट चांगला आहे. त्यामध्ये कोणताही घटक आढळलेला नाही. ज्या पाण्यामध्ये क्लोरिन हा घटक आढळतो त्या पाण्यामध्ये ई कोलाई हा शून्य असतो आणि ते पाणि पिण्यास योग्य असते.
यासोबतच आम्ही खासगी बोरवेल, विहिरी ज्याद्वारे खासगी टँकरने पाणी काही भागांमध्ये पुरवले जाते. त्या खासगी बोरवेल आणि विहिरीची चाचणी घेण्यात आली. यामध्ये 16 बोरवेलची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ई कोलाई हा घटक आढळला. त्यानंतर तात्काळ बैठक बोलावण्यात आली. त्यांना तोंडी सूचना दिली. पाण्यामध्ये बिचिंग पावडर मिसळण्याचे आदेश दिले. तसेच यावेळी कर्मचाऱ्यांना यासंदर्भात ट्रेनिंग सुद्धा देण्यात आलं.
अनेकांना नोटिस देण्यात आली आहे. अनेकांनी तात्काळ टँकर निर्जुतरीकण करण्यात सुरुवात झाली आहे. तसेच आरोप्लॅटचीदेखील चौकशी करण्यात आली. 30 आरोप्लँटची तपासणी केली असता 19 आरोप्लटमध्ये ई कोलाई आणि बॅक्टेरिया काही प्रमाण अधित तर काही कमीप्रमाण आढळले त्यामध्ये आम्हाला क्लोरिन आढळले नाही. तर अशा आरोप्लँटवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या आदेशानुसार 9 ठिकाणी नोटीस देण्यात आली आहे. तसेच कारवाईनंतर काय परिणाम झाले याची पुढे तपासणी करणार असल्याचे पाणि पुरवठा उपायुक्तांनी म्हटले आहे.
तसेच,काही ठिकाणी नागरीकांच्या टाकीमधील आणि स्वयंपाक घरातील पाण्याची तपासणी केली. तर काही ठिकाणी पाण्यांमध्ये ई कोलाई घटक आढळला. त्यामुळे नागरिकांना सूचना आहे की, सोसायटीच्या लोकांनी बैठक घेऊन टाकीची विशेष काळजी घ्या. टाकीचे टोपन लावलं जात या याची काळजी घ्या. तसेच, पाणी पिताना उकळून प्या असं आवाहनही त्यांनी यावेळी केले.