Polytechnic Admissions 2025 | पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणास मुदतवाढ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश...

यासंदर्भातील सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रक्रियेचा तपशील आणि अर्ज सादरीकरणासाठी आवश्यक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Swapnil Hajare
  • Tue, 17 Jun 2025
  • 01:58 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

प्रातिनिधिक छायाचित्र...

मुंबई : राज्यातील प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमधील पदविका (पॉलिटेक्निक) प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. आजपर्यंत 1 लाख 28 हजार 102 उमेदवारांनी नोंदणी केली असून, यापैकी 1 लाख 10 हजार विद्यार्थ्यांनी शुल्क भरणा करून अर्ज सादर केले आहेत.

विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद आणि प्रमाणपत्रे मिळण्यात होणारा उशीर लक्षात घेता, विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेपासून वंचित ठेवू नये म्हणून अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.

या निर्णयानुसार अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत, आता 26 जून 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. यासंदर्भातील सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रक्रियेचा तपशील आणि अर्ज सादरीकरणासाठी आवश्यक माहिती https://dte.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Share this story

Latest