'चाकणकर आमच्या लाडक्या', बैठकीनंतर नीलम गोऱ्हेंनी मांडली भूमिका

महिला आयोगाच्या बैठकीनंतर चाकणकर आमच्या लाडक्या म्हणत मविआच्या नेत्यांवर गोऱ्हे यांनी बोचरी टीका केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Dhanshri Otari
  • Tue, 3 Jun 2025
  • 06:10 pm
Neelam Gorhe, Rupali Chakankar, criticizes the opposition, maharashtra politics

विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज महिला आयोगाच्या कारभाराची बैठक घेण्यात आली. यामध्ये आयोगाच्या कार्यपद्धती, मार्गदर्शक तत्वे आणि अडचणींचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर भूमिका मांडताना गोऱ्हे यांनी चाकणकर यांची पाठराखण केल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी चाकणकर आमच्या लाडक्या म्हणत मविआच्या नेत्यांवर बोचरी टीका केली.

वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणामुळे चाकणकर अडचणीत आल्या आहेत. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून गंभीर आरोप होत आहेत. महिलांच्या प्रश्नांसंदर्भात, महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. तसेच, मनसेकडून महिला आयोगाचा संपर्क नंबर बंद असल्याचा आरोपही करण्यात आला होता. यासोबतच, चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर महायुतीतील मित्रपक्ष देखील नाराज असल्याची चर्चा आहे. अशातच गोऱ्हे यांनी महिला आयोगाची बैठक बोलवल्याने सर्वांचे लक्ष चाकणकर यांच्या पदाकडे वळले. 

या बैठकीला महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकरणकर, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, निर्मला सामंत, शितल म्हात्रे, आमदार चित्रा वाघ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीनंतर नीलम गोऱ्ह यांनी माध्यमांशी संवाद साधत बैठकीत झालेल्या चर्चाविषयी माहिती दिली. तसेच, गोऱ्हे यांनी यावेळी आयोगाचा अध्यक्ष बदलणार यावरही भूमिका स्पष्ट केली. 

महिला आयोगाच्या कामकाजातील त्रुटी भरून काढल्या जातील. महिला अत्याचाराच्या प्रकरणांसोबतच ज्या महिलांना न्याय मिळतो, ती सुद्धा माहिती समोर आलं तर चांगलं होईल. असा टोला गोऱ्हे यांनी विरोधकांना मारला.  तर आयोगाचा अध्यक्ष बदलला जाणार नीलम गोऱ्हे काहीतरी करणार अशा चर्चा सुरु होत्या, पण बैठकीत अशी काही कानउघडणी झालेली नाही. चाकणकर आमच्या लाडक्या महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच, महिला अत्याचारविरोधी प्रत्यक्षात काम करण्याकडे लक्ष दिले, तर जनतेचे भले होऊन, 10 मते तरी त्यांना मिळतील, अशी टीकाही गोऱ्हे यांनी यावेळी विरोधकांवर केली. 

आयोगातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय

राज्य महिला आयोगातील काही पदांमध्ये त्रुटी आहेत, ती पदे भरण्यासंदर्भात सरकारने भूमिका घेतलेली आहे. त्याचबरोबर आयोगासाठी इमारतीची व्यवस्था करण्याची भूमिका घेतलेली आहे. आयोग आणि पोलिसांचा भरोसा सेल, पोलिसांच्या दक्षता कमिट्या आणि कौटुंबिक संरक्षण कायदा या सगळ्यांचा समन्वय करून पोलिसांनी वेळेत चार्जशीट दाखल करावी, केसेसचा निपटारा लवकर व्हावा, समझोता होत असताना समुपदेशन करण्याबरोबर पुरुष वर्गाचा सहभाग यामध्ये वाढावा यासंदर्भात चांगली चर्चा झाली, अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली.

महिलांसंदर्भातील विषयांवर विभागीय बैठका घेणार

लवकरच या वेगवेगळ्या विषयांवर आम्ही बैठका घेणार आहोत. काहींनी लेखी निवेदने दिलेली आहेत. ही पहिली आणि शेवटची बैठक नाहीये. पुढच्या काही काळात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये एकत्रितपणे काम व्हावे, यासाठी आम्ही विभागीय बैठका सुद्धा घेणार आहोत. आदिवासींसोबत काम करणारे कार्यकर्ते, सामाजिक विविध घटक आणि त्यांच्यासोबतचे कार्यकर्ते यांच्यामधून शासनाने जी आदिशक्ती मोहीम हाती घेतलेली आहे, ती मजबूत करण्यासाठी काम केले जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार आणि मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे यातील सूचना देऊन, त्या-त्या विभागाचा संदर्भातला पाठपुराव्यासाठी आम्ही वेगवेगळ्या विभागाच्या बैठका आणि पाठपुरावा करणार आहोत आणि सामाजिक संघटनांशी जोडून घेणार आहोत अशी माहिती गोऱ्हे यांनी यावेळी दिली. 

Share this story

Latest