Mumbai | मुंबई विमानतळावरून दोन अतिरेक्यांना अटक; दोघेही पुणे ISIS च्या स्लीपर सेलचे सदस्य असल्याचा आरोप....

पुण्यात आयईडी तयार करण्याच्या कटप्रकरणात फरार असलेल्या ISIS च्या स्लीपर मॉड्यूलमधील दोन दहशतवाद्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने मुंबई विमानतळावरून अटक केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Editor User
  • Sat, 17 May 2025
  • 01:43 pm
Maharashtra news,Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune,

प्रातिनिधिक छायाचित्र...

मुंबई | पुण्यात आयईडी तयार करण्याच्या कटप्रकरणात फरार असलेल्या ISIS च्या स्लीपर मॉड्यूलमधील दोन दहशतवाद्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने मुंबई विमानतळावरून अटक केली आहे. अब्दुल्ला फयाज शेख ऊर्फ डायपरवाला आणि तल्हा खान अशी या दोघांची नावे असून, ते इंडोनेशियाच्या जकार्ता शहरात लपून बसले होते.

या दोघांना मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या टर्मिनल 2 वर उतरताच अडवून, एनआयएने अटक केली. हे दोघे 2023 च्या पुणे आयईडी कटप्रकरणात फरार होते. त्यांच्यावर अजामिनपात्र वॉरंट जारी होते आणि त्यांच्याबाबत माहिती देणाऱ्यास प्रत्येकी 3 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. एनआयएच्या तपासात उघड झाले की, 2022-23 दरम्यान पुण्यातील कोंढवा परिसरात भाड्याने घेतलेल्या घरात या आरोपींनी आयईडी बनवण्याचे प्रशिक्षण दिले आणि नियंत्रित स्फोट चाचणी घेतली.

या प्रकरणात एकूण 10 जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या विरोधात UAPA, स्फोटक पदार्थ कायदा आणि IPC च्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. या गटाने भारत सरकारविरोधात युद्ध छेडण्याचा कट रचत, देशात इस्लामिक राजवट प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने दहशतवादी कारवाया केल्या होत्या, असे एनआयएच्या तपासात स्पष्ट झाले आहे. सध्या सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे.

या प्रकरणात आतापर्यंत एकूण 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये आता अटक झालेल्या दोघांसह खालील आरोपींचा समावेश आहे: मोहम्मद इमरान खान, मोहम्मद युनूस साकी, अब्दुल कादिर पठाण, सिमाब काझी, झुल्फिकार बारोडावाला, शमिल नाचन, आकिफ नाचन, शहनवाज आलम, सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

Share this story

Latest