Mumbai | गिरगाव मेट्रो स्थानकाजवळ खचला रस्ता; बेस्ट बस अडकली 5 फूट खड्ड्यात....

ठाकूरद्वार सिग्नलजवळ मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणाच्या अगदी जवळून जात असताना बेस्टची एक बस अचानक रस्ता खचल्याने पाच फूट खोल खड्ड्यात अडकली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Editor User
  • Mon, 16 Jun 2025
  • 12:27 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

बेस्ट बसचा अपघात.....

मुंबई : मुंबईच्या गिरगाव परिसरात सोमवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. ठाकूरद्वार सिग्नलजवळ मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणाच्या अगदी जवळून जात असताना बेस्टची एक बस अचानक रस्ता खचल्याने पाच फूट खोल खड्ड्यात अडकली. 

गिरगावातील ठाकूरद्वार सिग्नलजवळ मुंबई मेट्रोचे खोदकाम सुरू आहे. त्याच भागात रस्त्याच्या समांतर बाजूने बेस्टची बस प्रवाशांसह जात होती. मात्र, अचानक बसच्या मागच्या चाकाखालील रस्ता खचला आणि ती बस पाच फूट खोल खड्ड्यात अडकली. या भागात मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे जमीन कमकुवत झाली होती, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेच्या वेळी बसमध्ये काही प्रवासी होते. मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही.  

दरम्यान, हा रहदारीचा रस्ता असून सकाळी चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर असते. त्यामुळे बेस्ट वाहतूक देखील या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात होते. त्यातच मेट्रो मुंबई मेट्रो लाईन 3 चे काम या परिसरात सुरू आहे. आणि आज बसचा या ठिकाणी अपघात झाला. वाहतूक पोलीस आणि मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमुळेच हे परिस्थिती उद्भवली आहे, असा संताप स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. तर, या रस्त्यावरून जात असताना अचानक मागचे टायर खड्ड्यामध्ये अडकले. बसमधील प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले असल्याची माहिती बस चालकाने दिली आहे. आता ही खड्ड्यातून बाहेर काढण्यात आली आहे.

Share this story

Latest