अत्याधुनिक साधनांनी पोलिस दल सक्षम करणार – मुख्यमंत्री फडणवीस
एसटी प्रवाशांना मोठा दिलासा; आता ‘या’ हॉटेल्सवर होणार कारवाई, परिवहनमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे आदेश
झाडाला लोंबकळणारी केबल बुलेटमध्ये अडकून अपघात
Advertisement

एसटी प्रवाशांना मोठा दिलासा; आता ‘या’ हॉटेल्सवर होणार कारवाई, परिवहनमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे आदेश

प्रवाशांना सकस आणि किफायतशीर जेवण न देणाऱ्या हॉटेल्सवर होणार कारवाई

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वाचा आदेश जारी करत एसटी प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. प्रवाशांना दर्जेदार सुविधा न देणाऱ्या हॉटेल-मोटेल थांब्यावर कारवाईचे निर्देश परविनह मंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळं एसटीच्या प्रवासादरम्यान एसटी बसला ठरवून दिलेले थांबे असतात. या थांब्यातील हॉटेलमध्ये अनेकदा प्रवाशांची गैरसोय होते. या थांब्यांची गंभीर दखल घेत अशा हॉटेल्सवर परिवहनमंत्री सरनाईक यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. 

 

लांब पल्ल्याच्या एसटी बस प्रवाशांच्या खाण्यापिण्यासाठी, जेवणासाठी महामार्गावर ठराविक ठिकाणच्या हॉटेलांवर थांबे घेतले जातात. मात्र, तेथील खाद्यपदार्थ बऱ्याचदा निकृष्ट दर्जाचे आणि जास्त किमतीचे असल्याचे आढळून आले आहे. अशा हॉटेल वा मोटेल थांब्यांवरची सेवा चांगली नसल्यास ते थांबेच रद्द करा, असे निर्देश परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. 

 

तसेच, कोणत्याही राजकीय हस्तेक्षेपाशिवाय थांबे रद्द करावेत आणि प्रवाशांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे असहे सरनाईकांनी म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी 15 दिवसांत सर्वेक्षण अहवाल सादर करण्याचा इशारा दिला आहे. राज्यभरातील हॉटेल- मोटेल थांब्यांचे नव्याने सर्वेक्षण करुन त्या ठिकाणी प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधांचे मुल्यमापन करुन अहवाल सादर करण्याचे आदेश एसटी प्रशासनाला दिलं आहेत. 

 

लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बस विविध हॉटेल-मोटेल थांब्यावर थांबतात. तेथे प्रवाशांना चहा-नाष्टा अथवा जेवण तसेच नैसर्गिक विधीसाठी वेळ दिला जातो. मात्र, प्रसाधनगृहे अस्वच्छ असणे,  फराळाचे जिन्नस शिळे, अशुद्ध व महाग असणे, याचबरोबर संबंधित हॉटेल वरील कर्मचारी व मालकांची वर्तणूक एसटी प्रवाशांच्या सोबत अत्यंत वाईट असणे अशा तक्रारी प्रवाशांकडून सातत्याने येत आहेत.  या तक्रारीची गंभीर दखल घेत मंत्री सरनाईक यांनी महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

 

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

अत्याधुनिक साधनांनी पोलिस दल सक्षम करणार – मुख्यमंत्री फडणवीस

Next Post

झाडाला लोंबकळणारी केबल बुलेटमध्ये अडकून अपघात