Maharashtra Weather
राज्यात अनेक ठिकाणी येत्या 3-4 दिवसांत कमाल तापमाना मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कमाल तापमान 3-4 अंशांनी वाढेल अशी शक्यता आहे.गेल्या 3 दिवसांपासून विदर्भात सामान्य तापमानाच्या तुलनेत अधिक तापमानाची नोंद झाली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यात येत्या दोन दिवसात तापमानात चढउतार राहणार आहे. उन्हाच्या झळा वाढल्या असून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे, विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णता अधिक जाणवत आहे. तर पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात सकाळी गारठा तर दुपारी उन्हाचा झळा जाणवत आहेत.
विदर्भ आणि मराठवाड्यात 35°C ते 39°C कमाल तापमानाची नोंद झाली आहे. नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर भागात रात्रीच्या तापमानात मोठी घट झाली, त्यामुळे सकाळच्या वेळी गारठा जाणवला पण दुपारी उन्हाच्या झळा लागणार असल्याचे हवामान खात्याने वर्तवले आहे.
सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती पूर्व राजस्थान आणि आजूबाजूच्या परिसरात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात राजस्थानसह उत्तर प्रदेशच्या काही भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची चिन्हे असल्याचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.