Pune | रमजान ईदनिमित्त गोळीबार मैदान चौक परिसरातील वाहतुकीत तात्पुरते बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग...
Breaking News : अशोक खरात प्रकरण भोवले.! रुपाली चाकणकर पायउतार; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा…
PMC Pune | विनानिविदा कचरा प्रक्रिया प्रस्ताव ठेका अखेर रद्द...
Advertisement

Breaking News : अशोक खरात प्रकरण भोवले.! रुपाली चाकणकर पायउतार; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा…

मुंबई : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘अशोक खरात’ प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या चाकणकर यांना अखेर पद सोडावे लागले आहे. चाकणकर यांनी आपला राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवला आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी २० मार्च २०२६ रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (X/ट्विटर) वर पोस्ट करत आणि पत्राद्वारे या निर्णयाची माहिती दिली आहे.

चाकणकर यांचे ट्विट आणि सोशल मीडिया पोस्ट…

रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, “आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, आमच्या नेत्या तसेच राज्याच्या सन्माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावाहिनींकडे माझ्याकडे असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केला.सध्या विविध माध्यमातून होत असलेल्या आरोपांची निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने चौकशी व्हावी म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारत मी हा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत योग्य तो निर्णय आदरणीय सुनेत्रावहिनी घेतील! या प्रकरणाबाबत लवकरच मी सविस्तर भूमिका मांडेल.”

काय आहे नेमके प्रकरण?

अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेला स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्यासोबत रुपाली चाकणकर यांचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावरून विरोधकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राजीनाम्याची जोरदार मागणी केली होती.

मुख्यमंत्र्यांचे आदेश अन्…

या वादामुळे सरकारची प्रतिमा मलीन होत असल्याचे पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकणकर यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राजीनाम्यात काय म्हटले आहे..?

प्रति,
मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब,
मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य

विषयः अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य महिला आयोग ह्या पदाचा राजीनामा स्विकारणेबाबत

माननीय महोदय,

मी, सौ. रुपाली निलेश चाकणकर, वरील विषयान्वये आपणांस विनंतीपूर्वक कळवू इच्छिते की, दि. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी माझी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली होती. माझ्या वैयक्तिक कारणाने मी स्वेच्छेने सदर पदाचा राजीनामा ह्या पत्राद्वारे आपणांस सादर करत आहे.

आजवर माझ्यावर विश्वास दाखवून आपण मला सर्वतोपरी सहकार्य केले त्याबद्दल मी आपली व सर्व सहकाऱ्यांची शतशः ऋणी आहे. भविष्यातही आपले असेच सहकार्य राहील असा मला विश्वास आहे.

तरी आपण माझा अध्यक्षा, राज्य महिला आयोग ह्या पदाचा राजीनामा स्वीकारावा अशी आपणांस नम्र विनंती आहे.

धन्यवाद…!

आपली विश्वासू
(सौ. रूपाली निलेश चाकणकर)

पोलीस महासंचालकांची भेट

राजीनामा देण्यापूर्वी चाकणकर यांनी पोलीस महासंचालकांची भेट घेऊन अशोक खरात प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आणि दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अध्यक्षपद कोणाकडे जाणार?

या राजीनाम्यानंतर आता राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद कोणाकडे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीय वर्तुळात या निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

Pune | रमजान ईदनिमित्त गोळीबार मैदान चौक परिसरातील वाहतुकीत तात्पुरते बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग...

Next Post

PMC Pune | विनानिविदा कचरा प्रक्रिया प्रस्ताव ठेका अखेर रद्द...