मोठी बातमी, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याच्या घरावर आयकर विभागाची धाड

विधानसभा निवडणुकीपूर्वी संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अजित पवारांची साथ सोडत शरद पवार गटात प्रवेश केला होता. मात्र आता पुन्हा अजितदादांच्या गटात घरवापसी करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Dhanshri Otari
  • Wed, 5 Feb 2025
  • 10:50 am
NCP,Sanjeevraje Naik Nimbalkar,Raghunathraje Naik Nimbalkar,Ramraje Naik Nimbalkar,NCPSP,   Central Agency Raid,राष्ट्रवादी काँग्रेस, संजीवराजे नाईक निंबाळकर,

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे सातारा जिल्ह्यातील बडे नेते संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर खात्याची धाड पडली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अजित पवारांची साथ सोडत शरद पवार गटात प्रवेश केला होता. मात्र आता पुन्हा अजितदादांच्या गटात घरवापसी करणार असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, या घडामोडीमुळं राजकीय गोटात हालचालींना वेग आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 50 आयकर विभागाच्याअधिकाऱ्यांची टीम संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील घरामध्ये पोहचली आहे. कारखाने इतर व्यावसायिक ठिकाणी देखील आयकर विभागचे अधिकारी जाणार असल्याची मिळाली आहे. तसेच, सकाळी सहा वाजल्यापासूनच बंगल्यामध्ये इन्कमटॅक्स अधिकाऱ्यांकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमाणं  रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्याघरीदेखील आयकर विभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत. मात्र, अद्याप या धाडीमागचे कारण स्पष्ट झालेलं नाही. हे दोघेही रामराजे यांचे चुलत बंधू आहेत. 

संजीवराजे नाईक निंबाळकर हे येत्या काही दिवसांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या चर्चेनं उत आला होता. त्यापूर्वीच हा छापा पडल्याने अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. 

Share this story

Latest