Sanjay Raut- Chhagan Bhujbal
वर्षा बंगल्याच्या बाहेरच्या लॉनमध्ये गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात बळी देण्यात आलेल्या रेड्यांची शिंग आणून पुरली आहेत. असा दावा संजय राऊत यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली. दरम्यान, राऊतांच्या दाव्यावर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यानं प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी भुजबळ यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. तसेच, राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर मिश्किल टिप्पणी केली. वर्षा बंगल्यावर शिंगं पुरली असतील तर ती बाहेर काढा, असं भुजबळ यावेळी हसत म्हणाले.
नेमकं काय म्हणाले भुजबळ?
वर्षा बंगल्याच्या बाहेरच्या लॉनमध्ये गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात बळी देण्यात आलेल्या रेड्यांची शिंग आणून पुरली आहेत. आम्ही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही. मात्र, वर्षा बंगल्यावरील कर्मचारी वर्गात अशी कुजबुज रंगली असल्याचे राऊतांनी म्हटलं आहे. यासंदर्भात भुजबळांना सवाल उपस्थित केला असता, भुजबळ खळखळून हसले आणि म्हणाले, ठीक आहे मी काय सांगू शकत नाही. कुठं गाडलेत, ती काढा म्हणावं बाहेर, कुणी तरी बाहेर बोललं असेल. मला काही माहिती नाही. असं म्हणत भुजबळांनी मी त्याबाबत अधिक बोलणार नाही असही म्हटलं.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन दोन महिने होत आले तरी अद्याप ते वर्षा बंगल्यावर राहायला गेलेले नाहीत. नेमकं कारण अद्याप समोर आलं नसले तरी, विरोधकांकडून हा मुद्दा उचलून धरत एक वेगळेच वळण दिलं जात आहे. मात्र अद्याप मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.