उद्धव ठाकरेंमुळे मला काँग्रेस पक्ष सोडावा लागला; शिवसेनेचे राज्यसभा सदस्य मिलिंद देवरा यांचा आरोप

काँग्रेसमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात गेलेले राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांनी पुन्हा एकदा 'उबाठा'चे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच आपल्याला काँग्रेस पक्ष सोडावा लागला

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Amol Warankar
  • Wed, 22 May 2024
  • 05:56 pm
Milind Deora

उद्धव ठाकरेंमुळे मला काँग्रेस पक्ष सोडावा लागला; शिवसेनेचे राज्यसभा सदस्य मिलिंद देवरा यांचा आरोप

#मुंबई : काँग्रेसमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात गेलेले राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी पुन्हा एकदा 'उबाठा'चे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच आपल्याला काँग्रेस पक्ष सोडावा लागला, असा गंभीर आरोप मिलिंद देवरा यांनी केला आहे. काँग्रेस माझ्यासाठी आता भूतकाळ आहे. मला आता भविष्यात बघायचे आहे. साऊथ मुंबई देशातील सगळ्यात बेस्ट मतदारसंघ आहे आणि त्यामुळे जेव्हा मी काँग्रेसमध्ये होतो तेव्हा काँग्रेस नेतृत्वाला स्पष्ट सांगितले की आपण ही जागा गमवायला नको. पण उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला खूप जास्त दबाव टाकला आणि त्यामुळे मला बाहेर पडावे लागले.

माझ्या मनात कुठेही घालमेल नाही. काही संदेश नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला संधी दिलेली आहे. मला राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवले. त्यामुळे मी फार आनंदी आहे. शिवसेनेच्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार यामिनीताई जाधव या फायटर आहेत आणि यामिनीताई नक्कीच निवडून येतील. याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही, असा विश्वास शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांनी व्यक्त केला.

एक प्रकारची ही सगळी विचित्र अवस्था होती. गेल्या ४५ वर्षांत कायम देवरा कुटुंबीयांचेच नाव बॅलेट पेपरवर होते आणि मला गर्व आहे की मी फॅमिली मेंबरसाठी मतदान केले नाही तर मी शिवसेनेच्या धनुष्यबाणाला मत दिले. मोदींचे हात बळकट करण्यासाठी मी मत दिले, असे मिलिंद देवरा म्हणाले. महायुतीकडे पाच पांडव होते आणि या पाच पांडवांनी या ठिकाणी काम केलेले आहे. मी स्वतः एक पांडव आहे त्यातलाच. गिरणी कामगारांचा फार जटिल प्रश्न आहे. विकासाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी काम करायचे आहे, असेही देवरा म्हणाले.

अरविंद सावंत यांचा प्रभाव निश्चित

ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत निवडून येणार नाहीत. २०१४, २०१९ नंतर त्यांनी काही कामे केलेली नाहीत. ते मोदी लाटेत निवडून आले. त्यांचा कुठलाही जनसंपर्क नाही. त्या भागात कधी फिरत नाहीत. लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी ते कुठलेही काम करत नाहीत. त्यांनी नागरिकांसाठी कोणतीही बैठक बोलावली नाही. त्यांनी ना बीएमसीसोबत ना म्हाडासोबत बैठक बोलावली.  त्यांनी गृहनिर्माण मंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री यांच्यासोबत नागरिकांच्या घरांच्या समस्येवर बैठक आयोजित केली नाही. त्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले नाही. मग जनतेला न्याय मिळणार कसा?, असा सवाल मिलिंद देवरा यांनी केला. मतदान धिम्या गतीने झाले असा आरोप करणे हे विरोधकांचे षडयंत्र आहे. आपली हार झाकण्यासाठी त्या पद्धतीचे वक्तव्य करत आहेत. दक्षिण मुंबईमध्ये यामिनीताई निवडून येतील आणि मोठ्या मताधिक्याने त्यांचा विजय होईल, असा दावा मिलिंद देवरा यांनी केला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest